सिद्धेश तेंडोलकर यांच्या प्रयत्नांना यश
⚡सावंतवाडी ता.०८-: मळगाव गावात गेले 5-6 दिवस जिओ नेटवर्क गायब होते याबाबत सिद्धेश तेंडोलकर राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष यांनी जिओच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. आज पर्यंत पुन्हा नेटवर्क सुरळीत करण्याचे काम करून देतो असे संबंधित अधिकारी यांनी सांगितले होते. आजपासून जीओचे नेटवर्क चालू झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
