तात्काळ झाकण बसवा;राष्ट्रवादीच्या हिदायतुल्ला खान यांची मागणी
सावंतवाडी ता.०८-:येथील सालईवाडा परिसरात गटारावर झाकणं घालून घेण्यात यावी, अशी मागणी महिनाभरापूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. परंतु अद्याप देखील नगरपालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे दर मंगळवारी आठवडा बाजाराला येणाऱ्या नागरिकांना ट्राफिकच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्वरित याची नगर परिषदेने दखल घेऊन या गटारांवर झाकण बसवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान यांनी केली आहे.
