⚡मालवण ता.०८-: मालवण मधील तेली समाजाच्या २०२२- २०२३ या शैक्षणिक वर्षातील दहावी (७५%), बारावी (७०%) उत्तीर्ण तसेच पदविका मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिका व आधारकार्ड झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड करून तसेच मागील बाजूस पालकांचे नाव व पत्ता, मोबाईल क्रमांक लिहून तेली समाज मालवणचे सचिव मंगेश विठ्ठल शेर्लेकर, घर नं. ११६२, गुरुकृपायोग, वायरी केळबाई रोड, मालवण या पत्त्यावर पाठवावेत. तसेच या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी दि. १३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता भंडारी ए. सो. हायस्कुल मालवण येथे कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन तेली समाज उन्नती मंडळ मालवण तर्फे करण्यात आले आहे.
मालवण मधील तेली समाजाच्या विद्यार्थ्यांना आवाहन
