डास निर्मुलन फवारणी करा…

अन्यथा उपोषण:महेश पांचाळ यांच्या पालिका प्रशासनाला इशारा..

⚡सावंतवाडी ता.०८-: पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही आपल्या नगरपरिषद प्रशासनाकडून डास निमुर्लन फवारणी झालेली नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून मोठया प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच डेंग्यू, मलेरीया यासारखे साथीचे आजार सावंतवाडी शहरात पसरले आहेत.त्यामुळे निर्मुलन फवारणी त्वरित करावी आशी मागणी भाजपचे माजी तालुका सरचिटणीस महेश पांचाळ यांनी मुख्याधिकारी यांच्याकडून निवेदनद्वारे केली आहे.दरम्यान येत्या १५ ऑगस्ट पूर्वी या समस्या न सोडवल्यास स्वातंत्र्यदिनादिवशी नगरपरिषदेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की शहरातील रस्त्यावर घसरण झालेल्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर फवारणी करण्यात यावी तसेच सार्वजनिक विहिरीमध्ये टी.सी.एल. टाकावी., रस्त्यावर, गटारांत ड्रेनेज सोडणा-या व्यक्तीवर, तसेच गटारामध्ये बिल्डींग मटेरीयल टाकून गटारे पॅक करणा-या ठेकेदारांवर कारवाई करावी तसेच वेळोवेळी सांगूनही कोणतीही कारवाई न करणा-या आपल्या निष्क्रीय कर्मचा-यांवर कारवाई करावी अशा विविध मागणी त्यांनी यावेळी आपल्या निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

You cannot copy content of this page