Headlines

Global Maharashtra Breaking News

भाजपा भटके विमुक्त आघाडीने समाजाला न्याय देवूया…

जिल्हाध्यक्ष नवलराज काळे:प्रभाकर सावंत यांच्याहस्ते पदाधिकाऱ्यांना देण्यात आली नियुक्ती पत्रे.. ओरोस ता.१३-: आपण पूर्ण जबाबदारीने ही पदाची जबाबदारी स्वीकारलात. या पदाच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळेल अशा प्रकारचे कार्य सर्वांच्या हातून घडेल या पद्धतीचे काम आपण सर्वांनी करायचे आहे, असे आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी केले. पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र सिंधुदुर्गनगरी येथील भाजप…

Read Full News

शिक्षकेतर कर्मचारी यांना 24 वर्षे नंतरचा लाभ मिळणार…

ना.दिपक केसरकर:मंत्री महोदयां समवेत सकारात्मक चर्चा झाल्याने २० रोजीच अंदोलना स्थगित.. ⚡मुंबई दि.१२-: राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाच्या मागण्यांबाबत आज राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ पदाधिकार्‍यां समवेत झालेल्या बैठकीत अनेक मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे त्यामूळे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे यामध्ये न्यायालयीन निकालानुसार…

Read Full News

खावटी कर्जमाफी द्या…

शेतकऱ्यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन.. सिंधुदुर्गनगरी ता १२सन २०१७ च्या यादितील तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवी या मागणीकड़े आज जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन लक्ष वेधले . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातिक व आंबा व काजू पीक घेणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी मिळाली नाही यासाठी त्यांनी आज सोमवारी पुन्हा जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले…

Read Full News

कोकम प्रक्रिया मशीन देण्यास टाळाटाळ…

घे भरारी महिला बचतगटाचे खादी ग्रामोद्योग कार्यालयात ठिय्या आंदोलन… सिंधुदुर्गनगरी ता १२खादी ग्रामोद्योग आयोग आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत कोकम प्रक्रिया उद्योगाची मशीन मंजूर असतानाही ती देण्यास टाळाटाळ होत असल्याने “घे भरारी” महिला बचत गट कवठी या गटाच्या सदस्या साक्षी सुभाष जोशी यांनी आज जिल्हा खादी ग्रामोद्योग कार्यालयात ठिय्या आंदोलन…

Read Full News

जिल्ह्यात उद्या जंतनाशक गोळ्यांचे वाटप…

१ ते १९ वर्षाखालील खाऊ घालणारा गोळ्या. सिंधुदुर्गनगरी ता १२जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत १३ फेब्रुवारी व २० फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत १ ते १९ वयोगटातील १ लाख ३८ हजार ४९३ मुलांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली. जंतामुळे…

Read Full News

एक तरी झाड लावा या संकल्पनेतून तुळशीचे रोप देऊन सावंतवाडीत अंगणवाडी तर्फे हळदीकुंकू केला साजरा…

⚡सावंतवाडी ता.१२-: एक तरी झाड लावा या संकल्पनेतून तुळशी वृंदावनाचे रोप देऊन आगळावेगळा हळदीकुंकू सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील अंगणवाडी च्या वतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी पदी आरोग्य व क्रीडा माजी सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या सुविद्य पत्नी. सौ श्रेया आडीवडेकर ह्या होत्या. माठेवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 2 मधील अंगणवाडी क्रमांक 15…

Read Full News

रोटरी क्लब सावंतवाडी च्या वतीने घेण्यात आलेल्या फिजिओथेरपी सेंटरमध्ये 27 जणांनी केली मोफत तपासणी…

⚡सावंतवाडी ता.१२-: रोटरी इंटरनॅशनल क्लबच्या वतीने सावंतवाडी येथे फिजिओथेरपी सेंटर साठी अडीच लाख रुपयांचे अत्याधुनिक मशीन बसवण्यात आले असून याचा लाभ सर्वसामान्यांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी चे अध्यक्ष सुहास सातोसकर यांनी केले. अल्प दरात सर्वांसाठी ही सुविधा उपलब्ध असल्याचे ते म्हणालेते फिजिओथेरपी मोफत तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या फिजिओथेरपी सेंटरमध्ये…

Read Full News

शालेय जीवनात स्पर्धात्मक परीक्षाना फार मोठे महत्व…

श्री. वामन खोत:भंडारी हायस्कुल येथे शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे शानदार शुभारंभ.. ⚡मालवण ता.१२-: शालेय जीवनात स्पर्धात्मक परीक्षाना फार मोठे महत्व आहे. शिष्यवृत्ती म्हणा अथवा तत्सम ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्या परीक्षामुळे मुलांमधील शैक्षणिक गुणवत्ता ही वाढीस लागते. आज भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबईने भंडारी हायस्कुल एस. एस. सी. बॅच १९८५ – ८६ च्या सहकार्याने शिष्यवृत्ती मार्गदर्शन…

Read Full News

मनसेच्या बैठकांना स्वतःच्या गावातून भाडोत्री आणावे लागतात हेच संदीप दळवींचे कार्य…

मंदार नाईक: उपरकरांवर टीका करणाऱ्या दळवींचा जिल्ह्यात योगदान काय..? ⚡सावंतवाडी ता.१२-: स्वतःच्या आरोस गावात मनसेच्या शाखेच्या सदस्यांनी राजीनामा देऊन शाखा पूर्णपणे बरखास्त केली त्या गावात पैसे देऊन भाडोत्री माणसं बैठकांना आणावे लागतात हेच संदीप दळवींचं आजपर्यंत पक्षाचं कार्य अशी टीका उपरकर समर्थक मंदार नाईक यांनी आज येथे केली आहे.दरम्यान जिल्ह्यात उपरकर यांनी लावलेला बॅनर वरून…

Read Full News

एसटी चालकाला मारहाणप्रकरणी रत्नाप्रभा वळंजूसह दोघे निर्दोष…

⚡कणकवली ता.१२-: वारगांव येथील एसटी बस स्टॉपवर प्रवाशांनी हात दाखवूनही बस अर्धा कि.मी. पुढे नेऊन थांबविल्याबाबत बस चालकाला शिवीगाळ करून फोनद्वारे तळेरे स्थानकावर कार्यकर्त्यांना जमण्यास सांगितले. तसेच तळेरे येथे कार्यकर्त्याद्वारे चालकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून तत्कालीन जि.प. सदस्या रत्नप्रभा वळंजू व तळेरे येथील किशोर भांबुरे यांची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश…

Read Full News

You cannot copy content of this page