Headlines

Global Maharashtra Breaking News

मळगाव येथे १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव…

मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुपच्यावतीने आयोजान:विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल… *सावंतवाडी : *सहदेव राऊळ :* हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांच्यावतीने सोमवार १९ फेब्रुवारी रोजी भव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले आहे. यावेळी…

Read Full News

मालवण येथील आंबा बागायतदार डॉ उत्तम फोंडेकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान…

⚡मालवण ता.१४-: मालवण कुंभारमाठ येथील प्रतिथयश आंबा बागायतदार डॉ उत्तम फोंडेकर यांना हापूस आंब्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्लीत नुकतीच मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आल्या नंतर डॉ श्री. फोंडेकर यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत यथोचित सत्कार केला. मालवण कुंभारमाठचे रहिवासी असणारे आंबा बागायतदार डॉ. उत्तम फोंडेकर यांना नुकतीच मानद डॉक्टरेट प्रदान…

Read Full News

५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण संपन्न…

⚡सावंतवाडी ता.१४-: ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण बुधवारी मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर ऑनलाईन उपस्थित होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशल स्कुल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यामाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात…

Read Full News

घोटगे येथील देवी बोरचाई मंदिरचा उद्या वर्धापन दिन सोहळा…

⚡कुडाळ ता.१४-: घोटगे येथील श्री देवी बोरचाई मंदिरचा वर्धापन दिन सोहळा उद्या, १५ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे.१५ रोजी सकाळी ८ वाजता गणेश पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्य वरण, “देवीवर देवीसुक्तांचा महाभिषेक” महापूजा, देवता स्थापन, अग्निस्थापना, गृहस्थापना, सग्रहमख, सप्तशती, पाठ हवन, बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, प्रार्थना, आरती, दुपारी १२.३० वाजता आरती, तीर्थप्रसाद,…

Read Full News

काजू बीला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे उद्या धरणे आंदोलन…

प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयासमोर होणारा आंदोलन:सावंतवाडी दोडामार्ग फळबागायतदार संघाची पत्रकार परिषदेत माहिती.. ⚡बांदा ता.१४-: कोकणातील काजू बी ला किमान २०० रुपये हमीभाव मिळावा. डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू करावा. तसेच काजू गरावर २० टक्के हून अधिक आयात शुल्क आकारावे, या मागण्यांसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यातील काजू बागायतदार शेतकरी शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी…

Read Full News

बेकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघांच्या आवळल्या मुसक्या…

कुडाळ पोलिसांची कारवाई: 25 लाखाचा मुद्देमाल जप्त.. ⚡कुडाळ ता.१४-: बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूककेल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १० लाखाच्या दारूसह १५ लाखाची गाडी असा एकूण २५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्वेश भास्कर केरकर (वय २७ रा. सातार्डा ता. सावंतवाडी ) व गौरव गिरीधर केरवडेकर (वय ३४ रा. केरवडे, ता….

Read Full News

भिंतीचित्र महोत्सव स्पर्धेत अक्षय जाधव प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.१४-: माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आयोजित केलेल्या भितीचित्र महोत्सवात अक्षय जाधव याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याने नगरवाचनालय येथे शाडू मातीपासून आकर्षक मूर्ती बनवून पारंपरिक लोककला जपणारे मूर्तीकार, कोकणातील स्थानिक मच्छिमार, वेंगुर्ला शहराची ओळख असलेले शून्य कचरा केंद्र आदींविषयी माहिती देणारे आकर्षक चित्र रेखाटले.

Read Full News

वेंगुर्ला तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्षपदी शिवराम आरोलकर…

⚡वेंगुर्ला ता.१४-: अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावांत जादूटोणा, भोंदूबाबा, भानामती या बाबतीत सविस्तर माहिती देऊन अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बाबतीत जनजागृती होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व सावंतवाडी जेष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष अरुण मेस्त्री यांनी वेंगुर्ला तालुका येथील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बैठकीत केले. जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी…

Read Full News

संजय मालवणकर स्मृती शिक्षणमंत्री चॅम्पियनशिप देसाई इंग्लिश स्कूलला…

⚡वेंगुर्ला ता.१४-: दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत केलेल्या येथील शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था व जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या संजय मालवणकर स्मृती शाश्वत कला-क्रीडा जागृतोत्सवातील विविध स्पर्धांना जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालवाडी ते खुल्या गटात विद्यार्थी व पालकांसाठी घेण्यात आलेल्या बडबडगीत, श्लोक पाठांतर, फॅन्सी ड्रेस, सवेश अभिनय, रंगभरण, बालकुमार…

Read Full News

पत्रकारितेतील योगदानासाठी भाई चव्हाण यांना पुरस्कार…

⚡कणकवली ता.१४-: सामाजिक कार्यासह पत्रकार क्षेत्रात ४० वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांना कणकवली तालुका प्रवासी संघटनने पत्रकारितेचा उत्कृष्ट योगदानाबाबत पुरस्कार जाहिर केला आहे. रथसप्तमी दिनी शुक्रवार १६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात अन्य ९ जणांसह मान्यवरांचा हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Read Full News

You cannot copy content of this page