⚡सावंतवाडी ता.१४-: ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण बुधवारी मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर ऑनलाईन उपस्थित होते.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर आणि यशवंतराव भोसले इंटरनॅशल स्कुल, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यामाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
वितरणचे वाचन श्री. राजकुमार अवसरे ज्येष्ठ अधिव्याख्याता राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांनी केले. प्राथमिक विद्यार्थी गटात शि. प्र. म. माध्यमिक कन्या शाळा घाटंजी, जि. यवतमाळच्या कार्तिकी किरण डेहणकर हिच्या प्रकल्पाला प्रथम क्रमांक व चॅम्पियनशिप प्रदान करण्यात आली. माध्यमिक विद्यार्थी गटात महर्षी व्यास माध्यमिक विद्यालय, वेल्हाळे जिल्हा जळगाव च्या अनिकेत रमेश सुरवाडे याला प्रथम क्रमांक मिळाला. दिव्यांग विद्यार्थी प्राथमिक गटात स्वामी विवेकानंद विद्यालय, देवलापार, जि. नागपूरचा वंश विलास मरस्कोल्हे याला तर माध्यमिक गटात एस. एम. चोकशी हायस्कूल पुणेचा रुशील मिलिंद पाटडीया याला प्रथम क्रमांक मिळाला. आदिवासी विद्यार्थी प्राथमिक गटात स्वामी विवेकानंद विद्यालय, देवलापार जि .नागपूरची आसावरी अशोक असावाले माध्यमिक गटात अनु. माध्यमिक आश्रमशाळा आष्टी जि . यवतमाळचा कार्तिक दिगांबर पेदेवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शिक्षक प्रतिकृती प्राथमिक गटात शहिद मिश्रा विद्यालय, तिरोडा, जि . गोंदिया चे एल. वाय. चौरावार व माध्यमिक गटात गांधी विद्यालय, आर्वी जिल्हा वर्धाचे रौशन रऊफ शेख यांना प्रथम क्रमांक मिळाला.
प्रयोगशाळा परिचर गटात सेंट जोसेफ स्कूल मुंबई (प.) चे भगत भास्कर अनंत यांचा प्रथम क्रमांक आला. सर्व विजेते, सहभागी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व चषक देऊन सन्मान करण्यात आला. पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला ११६५९ विद्यार्थ्यांनी भेट देवून माहिती घेतली.
