⚡कणकवली ता.१४-: सामाजिक कार्यासह पत्रकार क्षेत्रात ४० वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांना कणकवली तालुका प्रवासी संघटनने पत्रकारितेचा उत्कृष्ट योगदानाबाबत पुरस्कार जाहिर केला आहे.
रथसप्तमी दिनी शुक्रवार १६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात अन्य ९ जणांसह मान्यवरांचा हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
