संजय मालवणकर स्मृती शिक्षणमंत्री चॅम्पियनशिप देसाई इंग्लिश स्कूलला…

⚡वेंगुर्ला ता.१४-: दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला यांनी पुरस्कृत केलेल्या येथील शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था व जागृती कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या संजय मालवणकर स्मृती शाश्वत कला-क्रीडा जागृतोत्सवातील विविध स्पर्धांना जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालवाडी ते खुल्या गटात विद्यार्थी व पालकांसाठी घेण्यात आलेल्या बडबडगीत, श्लोक पाठांतर, फॅन्सी ड्रेस, सवेश अभिनय, रंगभरण, बालकुमार चित्रकला, बालनृत्य, एकेरी नृत्य, मॅरेथॉन, माय-लेकरू नृत्य व समूहनृत्य स्पर्धेत तब्बल १३२० स्पर्धकांनी सहभाग घेतला.

  महोत्सवात घेतलेल्या विविध स्पर्धांमधील प्रथम पाच पुढीलप्रमाणे-बडबडगीत गायन स्पर्धा गट बालवाडी - शौर्य धुरी, तनीशा सातार्डेकर, ईश्वरी गवळी, ओजस्वी वेंगुर्लेकर, अनन्या नंदगिरीकर. स्पर्धेचे परिक्षण बाळू खामकर व संध्या खामकर यांनी केले. श्लोक पाठांतर स्पर्धा ः गट बालवाडी - महंत शेर्लेकर, तन्वी केळुसकर, अनन्या नंदगिरीकर, तन्मय राऊळ, कृष्णा पाटील. पहिली ते चौथी गट - ज्ञानेश्वरी तांडेल, आर्या वेंगुर्लेकर, दुर्वा सोन्सुरकर, केदार आपटे, आर्या सोन्सुरकर. स्पर्धेचे परीक्षण आत्माराम बागलकर, बाबूराव खवणेकर व सीमा मराठे यांनी केले. फॅन्सी ड्रेस स्पर्धाःगट बालवाडी-सिराज कोंडुसकर, श्रीयांत किनळेकर, पुनर्वी दळवी, प्राप्ती मोरे, मनस्वी पालकर. स्पर्धेचे परीक्षण बाळू खामकर व पी.के.कुबल यांनी केले. सवेश अभिनय स्पर्धा ः गट पहिली ते चौथी - आराध्या राऊळ, प्रसन्न बर्वे, सान्वी सातार्डेकर, चिन्मय कोतेकर, आर्या साठम. गट पाचवी ते दहावी-वरदा परब, चिन्मयी परब, वीर गावडे, श्रावणी आरांवदेकर, आर्या चेंदवणकर. बालनृत्य स्पर्धा ः गट बालवाडी - समिधा वेंगुर्लेकर, पुनर्वी दळवी, दुर्वा गवस, प्रांजल जाधव, गंश परब. पहिली ते चौथी -स्वरा पावसकर, सान्वी रजपूत, दिशम परब, गुंजन गिरप, सई राऊळ. एकेरी नृत्य स्पर्धा ः गट पाचवी ते सातवी - अभंग रगजी, सीमा चव्हाण, दुर्वा पावसकर, वैष्णवी मुननकर, भक्ती सावंत. गटआठवी ते दहावी - श्रुती शेवडे, भास्कर सांगले, दिव्या बागायतकर, युक्ती हळदणकर, समृद्धी कावडे. परीक्षण कविता राऊळ व मनाली कुलकर्णी यांनी केले. रंगभरण स्पर्धा ः गट बालवाडी-युगा खानोलकर, गिरीजा गावडे, आदिती राणे, गंधार परब, राज प्रजापती. बालकुमार चित्रकला स्पर्धा ः गट पहिली ते चौथी-सान्वी चुडजी, सरस नाईक, हर्षल टेमकर, मोहित परब, भार्गव पालव, गट पाचवी ते दहावी-केतकी रेडकर, चिन्मय कुडपकर, प्राजक्ता शिरोडकर, गुंजन कुडपकर, निधी पेडणेकर. परीक्षण पिंट्या कुडपकर व अमोल सावंत यांनी केले.

 या जागृतोत्सवात सर्वाधिक पारितोषिके पटकावून वेंगुर्ल्यातील एम. आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलने संजय मालवणकर स्मृती शिक्षणमंत्री चॅम्पियनशिप पटकाविली. मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
You cannot copy content of this page