Headlines

Global Maharashtra Breaking News

गुरु माऊलींचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य :राजेंद्र पेडणेकर…

⚡कणकवली ता.०१-: माजी विद्यार्थी म्हणून आमच्या शाळा नंबर 3 च्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा वामन करंबेळकर यांना सन्मानित करण्याचे भाग्य लाभले, ज्यांनी प्राथमिक शिक्षण देऊन घडविले त्या गुरु माऊलींचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे.खरंच आम्ही भाग्यवान आहोत.असे प्रतिपादन राजेंद्र पेडणेकर यांनी केले.कणकवली येथे शाळा नंबर 3 च्या शिक्षिका वर्षा करंबेळकर यांच्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमात बोलत…

Read Full News

दहावीच्या परीक्षार्थीसाठी अर्चना घारेंकडून वाहन व्यवस्था…

⚡सावंतवाडी ता.०१-: आजपासून सुरू झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापासून दूर अंतरावर असलेल्या खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेत पोहोचण्याकरिता धावपळ करावी लागते. काही वेळा एसटी किंवा गाडी न मिळाल्यास तारांबळ उडते. असे होऊ नये म्हणून सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तीनही तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना…

Read Full News

वागदे नूतन ग्रामसचिवालयाचा5 मार्च रोजी भूमीपूजन सोहळा…

⚡कणकवली ता.०१-: केंद्र सरकारच्या नमो ११ सूत्री कार्यक्रमाअंतर्गत ग्रामसचिवालय बांधणे अभियान अंतर्गत वागदे ग्रामसचिवालय मंजूर झाले असूनआम.नितेश राणे यांच्या हस्ते व. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंगळवार ५ मार्च २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. वागदे नविन ग्रामपचायत इमारत बांधणे नमो ११ नमो ग्रामसचिवालय बांधणे अभियान अंतर्गत मंजूर…

Read Full News

कळसुली गवसवाडी लिंगेश्वर मंदिर येथे 2 मार्च रोजी हरीनाम सप्ताह…

⚡कणकवली ता.०१-: कळसुली गवसवाडी येथील लिंगेश्वर मंदिर येथे वार्षिक एकदिवसीय अखंड हरिनाम सप्ताह शनिवार 2 मार्च रोजी होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता घटस्थापना, साडेदहा ते साडेतीन वाजेपर्यंत तिर्थ प्रसाद व स्थानिक वारकरी भजने, दुपारी साडेतीन ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत वाडीतील सुश्राव्य भजने, संध्याकाळी साडेसहा ते रात्री आठ…

Read Full News

भंडारी प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन संपन्न…

⚡मालवण ता.२९-: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित मालवण येथील भंडारी प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे तसेच कला कार्यानुभव विषयांतर्गत केलेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन संपन्न झाले. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध विज्ञान प्रतिकृती सादर केल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारी ए. सो.हायस्कूलचे विज्ञान शिक्षक श्री. अवसरे यांच्या हस्ते फीत कापून तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे…

Read Full News

गुणाजी गावडे, योगेश नाईक यांचा अखेर शिंदे शिवसेनेत प्रवेश…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेला सावंतवाडीत जोरदार धक्क.. सावंतावडी ता.२९-: वेत्ये सरपंच गुणाजी गावडे व योगेश नाईक यांनी अखेर शिंदे शिवसेनेत प्रवेश केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा येथील निवासस्थानी हा प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी गुणाजी गावडे व योगेश नाईक यांच्यासोबत आरोस उपसरपंच प्रसाद…

Read Full News

पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित अग्निहोत्र कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.२९-: पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या वतीने पडवे माजगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या अग्निहोत्र कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये योग प्रसाराचे कार्य खूप मोठ्या वेगाने चालू आहे. सध्या पडवे माजगाव येथे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर चालू आहे. शंख प्रक्षालन, त्राटक, जलनिती, सूत्रनिती, नस्यनीती, नेत्रनिती, वमन क्रिया, ॲक्युप्रेशर, योग, सूर्यनमस्कार, प्राणायाम यासारख्या अनेक उपयुक्त अशा योगक्रियांचे…

Read Full News

युवा नेतृत्व श्री.यशवर्धन राणे यांनी घेतली किरण उर्फ भैय्या सामंत यांची घेतली भेट…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना संघटना बांधणी संदर्भात केली चर्चा… ⚡कुडाळ ता.२९-: युवानेतृत्व ऍडव्होकेट श्री.यशवर्धन राणे यांनी नुकतीच मुंबई येथील निवासस्थानी शिवसेना नेते श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांची सदिच्छा भेट घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना संघटना वाढीसंदर्भात चर्चा केली. दरम्यान युवकांसाठी कोणत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करता येतील तसेच आपल्या संघटनेकडे जास्तीत जास्त युवावर्ग कसा आकर्षित होईल याविषयी लक्ष…

Read Full News

मालवण शहरासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यामातून२२ विकास कामांना मंजूरी…

⚡मालवण ता.२९-: मालवण शहरासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीस अनुसरून नगरोध्यान व जिल्हा नियोजन विशेष निधीतून करून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मालवण कुडाळ विधानसभा संयोजक निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न करून हा निधी उपलब्ध करून घेतला आहे. त्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण व निलेश राणे यांचे भारतीय जनता पार्टी मालवण शहराच्या वतीने आभार व्यक्त…

Read Full News

स्काऊट गाईडमुळे स्वावलंबनाचे धडे…

पी. जे. कांबळे:विद्यामंदिर हायस्कूलमधील चिंतन दिन कार्यक्रमात प्रतिपादन.. ⚡कणकवली ता.२९-: स्काऊट गाईडमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. विद्यार्थी आत्मनिर्भर बनण्यास स्काऊट व गाईडची मोठी मदत होते. स्काऊट व गाईडमुळे शिस्त, नियमांचे पालन, एकाग्रता, स्वावलंबी बनण्यासाठी काय करावे, याचा अनुभव मिळतो. त्याचा तुमच्या भावी जीवनात नक्कीच उपयोग होतो, असे प्रतिपादन विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे…

Read Full News

You cannot copy content of this page