वागदे नूतन ग्रामसचिवालयाचा5 मार्च रोजी भूमीपूजन सोहळा…

⚡कणकवली ता.०१-: केंद्र सरकारच्या नमो ११ सूत्री कार्यक्रमाअंतर्गत ग्रामसचिवालय बांधणे अभियान अंतर्गत वागदे ग्रामसचिवालय मंजूर झाले असून
आम.नितेश राणे यांच्या हस्ते व. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंगळवार ५ मार्च २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे.

वागदे नविन ग्रामपचायत इमारत बांधणे नमो ११ नमो ग्रामसचिवालय बांधणे अभियान अंतर्गत मंजूर झाले. महाराष्ट्र राज्यातील ७३ ग्रामपंचायतींनाच सदर अभियानात घेण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्हयातून २ ग्रामपंचायतींचा या योजनेत समावेश करण्यात आला. त्यामध्ये कणकवलीतून वागदे ग्रामसचिवालय मंजूर झाले असून आम.नितेश राणे यांच्या प्रयत्नातून वागदे ग्रामसचिवालय मंजूर झाले.या अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी, विद्युत वितरण कार्यालय, पोस्ट ऑफीस, बचत गट ग्रामसंघ कार्यालय इत्यादी कार्यालये एकत्रितरित्या होणार असून नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. सरपंच सदीप रमाकांत सावंत यांनी जि. प. च्या माध्यमातून ८ गुंठे जागेची परवानगी घऊन सुसज्ज अशी इमारत उभी राहणार आहे.

You cannot copy content of this page