सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना संघटना बांधणी संदर्भात केली चर्चा…
⚡कुडाळ ता.२९-: युवानेतृत्व ऍडव्होकेट श्री.यशवर्धन राणे यांनी नुकतीच मुंबई येथील निवासस्थानी शिवसेना नेते श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांची सदिच्छा भेट घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना संघटना वाढीसंदर्भात चर्चा केली.
दरम्यान युवकांसाठी कोणत्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करता येतील तसेच आपल्या संघटनेकडे जास्तीत जास्त युवावर्ग कसा आकर्षित होईल याविषयी लक्ष वेधले.श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांनी सकारात्मक असल्याची ग्वाही यावेळी दिली.
