मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेला सावंतवाडीत जोरदार धक्क..
सावंतावडी ता.२९-: वेत्ये सरपंच गुणाजी गावडे व योगेश नाईक यांनी अखेर शिंदे शिवसेनेत प्रवेश केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा येथील निवासस्थानी हा प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी गुणाजी गावडे व योगेश नाईक यांच्यासोबत आरोस उपसरपंच प्रसाद नाईक यांनी आज प्रवेश केला
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे सेनेला हा जोरदार धक्का दिला आहे प्रवेश नरेंद्र मिठबावकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश संपन्न झाला त्यामुळे ठाकरे सेनेला सावंतवाडी तालुक्यात जोरदार धक्का बसला आहे
यावेळी जिल्हाप्रमुख अशोक दळवी तालुकाप्रमुख बबन राणे, सचिन वालवालकर, आरोस उपसरपंच प्रसाद नाईक.
महेश गावडे, राजेंद्र आंबेकर, गुरुनाथ गावडे, विजय गावडे, शेखर खांबल, संतोष गावडे, शरद जाधव, मारुती गावडे, महेश गावकर, अनंत गोठुसकर, हरिश्चंद्र गावकर, सुशील कुकुळकर, गुरुदास गावडे ,महेश गावकर, सतीश सातार्डेकर, संदीप गावडे आशिष गावकर, मनोज पाटकर अजय पाटकर, गिरीश कंबल, कन्हैया गोठसकर, राजन गावडे, सज्जन तेंडुलकर, सत्यवान गावडे, विश्वास गावडे, उदय निगुडकर, सचिन गावडे, उमेश पावसकर, कृष्णा गावडे, विठ्ठल चौगुले, सागर गावडे, साई राणे, प्रसाद गावडे रवींद्र गावकर,लवू गावडे आदी उपस्थित होते
