विशेष लोकअदालतीत एका दिवसात ४६ धनादेश अनादराची प्रकरणे निकाली…
तडजोडीतून तब्बल ५१.१५ लाख रुपयांचा समझोता.. ⚡ओरोस ता १८-: धनादेश अनादर (एनआय ॲक्ट, १८८१ कलम १३८) अंतर्गत प्रलंबित प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून जलदगतीने निकाली काढण्यासाठी आयोजित विशेष लोकअदालतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४६ प्रकरणांचा एकाच दिवशी निकाल लागला. या प्रकरणांमध्ये ५१ लाख १५ हजार ८७० रुपयांच्या तडजोडी करण्यात आल्या.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र…
