मळगाव गावच्या परंपरागत “मांजरी” प्रथेस मध्यरात्रीपासून सुरूवात…
दोन दिवस, तीन रात्रींचा देवांच्या विश्रांतीचा कालावधी:मानकऱ्यांसहीत सर्व गाव एकोप्याने जपतोय परंपरा… ⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ -: मळगाव गावच्या “मांजरी” या आगळ्यावेगळ्या परंपरेस बुधवार मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. मांजरी ही दोन दिवस आणि तिन रात्रींची असते. गावातील देवांचा विश्रांती घेण्याचा हा कालावधी असतो. या कालावधीत गावात मंदिरातील देवाची तसेच घरच्या देवाचीही पूजा केली जात नाही. मांजरी…
