Headlines

Global Maharashtra Breaking News

वैभववाडी येथे २० रोजी शासकीय भात खरेदी शुभारंभ…

⚡वैभववाडी ता.१८-:   वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाच्यावतीने शासकीय भात खरेदी करण्याचा शुभारंभ बुधवार दिनांक २० डीसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वा. संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.      यावेळी तहसिलदार दिप्ती देसाई, संघाचे सर्व संचालक,सोसायटी चेअरमन, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित राहाणार आहेत.    यावर्षी आॕनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून भात खरेदी केले जाणार आहे. प्रती…

Read More

भाताला हेक्टरी २० हजार रु बोनस जाहीर…

आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश.. ⚡कणकवली ता.१८-: राज्य शासनाकडून केल्या जाणाऱ्या भात खरेदीवर बोनस जाहीर करण्याच्या आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश आले आहे. भात खरेदीवर हेक्टरी २० हजार रु बोनस रक्कम सरकारने जाहीर केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी भात शेती करतात. शासनाकडून भात खरेदीवर क्विंटल मागे २१६५ रु दर दिला जात आहे.मात्र…

Read More

प्रा. कैलास राबते यांना राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श समाजसेवा पुरस्कार…

⚡मालवण ता.१८-: लोकराजा शाहू छत्रपती चॅरीटेबल ट्रस्ट इचलकरंजी या संस्थेच्या वतीने क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम‌गिरी करणा-याना दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श समाजसेवा गौरव पुरस्कार २०२३ मालवणच्या स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रा कैलास राबते यांना जाहीर करण्यात आला आहे लोकराजा शाहू छत्रपती चॅरीटेबल ट्रस्ट इचलकरंजी ही संस्था गेली…

Read More

घावनळे गावातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश…

⚡कुडाळ ता.१८-: घावनळे गावातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रविवारी शिवसेना पक्षात प्रवेश केला. आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून सर्वांचे पक्षात स्वागत केले. माजी सरपंच दिनेश वारंग, सरपंच आरती वारंग, शाखाप्रमुख संतोष नागवेकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश घेण्यात आला. यावेळी शिवसेना जिंदाबाद! आ.वैभव नाईक आगे बढो हम तुम्हारे…

Read More

संस्कृत भाषा विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी…

प्रा.प्रज्ञा जोशी:नगरवाचनालयातर्फे संस्कृत व्याकरण कार्यशाळा.. ⚡कणकवली ता.१८-: संस्कृत ही प्राचीन भाषा आहे. ही भाषा विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी, असे आवाहन प्राध्यापक प्रज्ञा जोशी यांनी केली. कणकवली येथील नगरवाचनालयातर्फे वाचनालयात संस्कृत व्याकरण कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह हनीफ पीरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, कार्यकारिणी सदस्य वैजयंती करंदीकर, विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक…

Read More

किरण सामंत खासदार व्हावे ही सिंधुदुर्गातील शिवसैनिकांची इच्छा…

हरेश पाटील:मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार.. ⚡कणकवली ता.१८-:रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांनी खासदार व्हावे अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे. “अब की बार भैय्या शेठ खासदार” अशी भावना सर्व कार्यकर्त्यांच्या मनात आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघाची उमेदवारी त्यांनाच मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील…

Read More

चाकू खुपसून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा…

मालवण ता.१९-:मालवण तालुक्यातील पोईप येथील सुभाष श्रीधर माधव यांना सख्या पुतण्याच्या पोटात चाकू खुपसून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.

Read More

गरड येथे मोरीच्या कामाचे शुभारंभ…

ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शुभारंभ; नगरोत्थान मधून मंत्री दीपक केसरकारांकडून तीन लाखाचा निधी मंजूर.. ⚡सावंतवाडी ता.१८-: येथील गरड अल्ली पाणंद येथील मोरी बांधकाम कामासाठी नगरोत्थान मधून नामदार दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमांतून तीन लाखांचा निधी मंजूर करण्यात आला.या कामाचा शुभारंभ येथील ज्येष्ठ नागरिक श्री.सावंत गुरुजी आणि आदम भाई शेख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी शिवसेना…

Read More

मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल मध्ये नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

संस्थेच्या चेअरमन सौ. शुभदादेवी भोंसले यांनी विदयार्थ्यांच्या कौशल्याची केली प्रशंसा;पालक व शिक्षकांचे मानले आभार… ⚡सावंतवाडी ता.१८-: सिं. जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स् इंग्लिश स्कूल मध्ये सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले. सोलो डान्स स्पर्धेत पहिली ते इयत्ता नववी ची मुले बहुसंख्येने सहभागी झाली. लोकनृत्य, कथ्थक, लावणी, भरतनाट्यम, हिपहॉप, कन्टेम्पररी, घुमरनृत्य बॉलिवूड डान्स…

Read More

निरवडे येथील संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ…

शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते शुभारंभ:मंत्री दिपक केसरकर यांच्या कडून ५ लाखाचा निधी मंजूर.. ⚡सावंतवाडी ता.१८-: निरवडे-माळकरवाडी जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत बांधण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या आमदार निधीतून ५ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी निरवडे सरपंच सुहानी गावडे,…

Read More
You cannot copy content of this page