विक्रेत्यांची माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे मागणी: मुख्याधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद..
⚡सावंतवाडी ता.१९-: पालिकेच्या भाजी मंडईच्या जागेत नवीन इमारत बांधकाम सुरू असल्याने दरवर्षी आंबा विक्री करणारी जागा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या हंगामाच्या दोन महिने करिता पर्याय जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी अंबा विक्रेत्यांनी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे आज केली.
दरम्यान आज आंबा विक्रेत्यांच्या शिस्तमंडळाने आज माजी नगराध्यक्ष संजू परब पर्व यांची भेट घेत चर्चा केली. यानंतर माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी याबाबत मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्याशी देखील चर्चा करीत आंबा विक्रेत्यांचे म्हणणे मांडले. यावर आपण योग्य त्या जागेबाबत विचार करू अशी आश्वासन श्री.परब यांना मुख्याधिकारी यांनी दिले.
