⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध क्रेशर उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजन वामन आंगणे (61) यांचे आज सांयकाळी कारिवडे भैरववाडी येथील राहत्या घरी निधन झाले. ते मुळचे मालवण आंगणेवाडी येथील असले तरी ते व्यवसाया निमित्त गेली अनेक वर्षे कारिवडे भैरववाडी येते स्थायिक झाले होते. सामाजिक क्षेत्रात नेहमी पुढे असल्याने आणि सढळ हस्ते मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. हेल्पलाईन मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी कित्येकांना आर्थिक मदत केली होती. सावंतवाडी भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक विद्यालयावर गेली वीस वर्षे ते कार्यरत होते. त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यामुळे त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सावंतवाडी शहरावर दुखाचा डोंगर पसरला आहे.
जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजन वामन आंगणे यांचे निधन…
