दाभिल श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी २४ डिसेंबर रोजी…
⚡सावंतवाडी ता.२३-: दाभिल गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी २४ डिसेंबर रोजी होणार आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी माऊलीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर कालिका देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवीण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची…
