पेण तालुक्यातील पाणीप्रश्न सुटणार…

सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून हेटवणे धरणासाठी ७६६ कोटींची मान्यता

रायगड : पेण तालुक्यातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून हेटवणे धरण प्रकल्पासाठी ७६६ कोटींची मान्यता मिळाली आहे. याचा ४५ गावांमधील ४२६८ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
गेले अनेक वर्षे पेण तालुक्यातील वाशी येथील नागरिकांना पाण्यासाठी खुप अडचणींना सामोरे जावे लागले होते. हेटवणे धरणासाठी तेथील नागरिकांनी अनेक वर्षे आंदोलने केली होती. पाण्याविना हाल अजुन किती दिवस चालणार असा प्रश्न तेथील नागरिकांना पडला होता, पण आता या समस्येचे निराकरण झाले आहे.
वाशी व वडखळ येथील खारेपाटात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होता. शेकडो महिला, पुरुष आणि मुलांनी पाण्याच्या प्रश्न सभागृहासमोर उपस्थित केला होता. शिवाय अनेक आंदोलने देखील केली होती. त्यावेळी काही नागरिक उपोषणाला देखील बसले होते.
आता या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून ७६६ कोटी रुपये निधीची मान्यता मिळाली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.

चौकट
दिलेला शब्द पूर्ण – सुनील तटकरे

पेण तालुक्यातील वाशी व वडखळ येथील खारेपाटात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर होता. ती समस्या मी जवळून पाहिली आहे, यांवर लक्ष देण्याचं ठरवलं. आता आपल्या सरकारने देखील सहकार्य केले आहे , महाराष्ट्र राज्य शासनाकडून या प्रकल्पासाठी निधी आणि मान्यता मिळाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. मी नागरिकांना दिलेला शब्द पाळून वचन पूर्ण केले आहे.

You cannot copy content of this page