⚡वेंगुर्ला ता.२६-: कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी एकनाथ रामचंद्र राऊळ यांची निवड करण्यात आली.
ही निवड कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर व उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनानुार कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक व सहसचिव सुधीर पराडकर यांनी केली आहे. एकनाथ राऊळ यांनी रिक्षा चालक-मालक संघटना वेंगुर्ला या संघटनेचे नऊ वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. श्री. राऊळ यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
