Headlines

Global Maharashtra Breaking News

सामंत ट्रस्ट तर्फे गरजूंना धनादेश वाटप…

⚡सावंतवाडी ता.०२-: येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे सामंत ट्रस्ट तर्फे बांदा येथील सुषमा मुळीये, अर्धांगवायूच्या आजाराने पिडीत सखाराम सावंत, कर्करोग पिडित हरीश्चंद्र पवार, गर्भाशयाच्या आजाराने पिडीत शांती शेडगे, पेंडूर येथील विजया गावडे आणि साहील गावडे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Read Full News

मालवण गवंडीवाडा येथे ७ रोजी रक्तदान शिबीर…

⚡मालवण ता.०२-: मालवण गवंडीवाडा येथील श्री राम मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त रविवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Full News

मालवण सेवानिवृत्त सेवक संघाची ७ रोजी सभा…

⚡मालवण ता.०२-: मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा रविवार दि. ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मालवण येथील टोपीवाला हायस्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेस सदस्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन तालुका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष मंगेश शेर्लेकर व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.

Read Full News

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत दिया धुरीचे घवघवीत यश…

⚡वेंगुर्ला ता.०२-: ब्रेन डेव्हलपमेंट (बीडीएस) परीक्षेत मदर तेरेसा इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ले येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी दिया धुरी ही विद्यार्थिनीने इंग्रजी माध्यम मधून तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. ७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत दियाने १०० पैकी ८७ गुण मिळवुन तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला असून तिने ब्रँझ मेडल प्राप्त केले आहे. दियाला…

Read Full News

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत दिया धुरीचे घवघवीत यश..

⚡वेंगुर्ला ता.०२-: ब्रेन डेव्हलपमेंट (बीडीएस) परीक्षेत मदर तेरेसा इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ले येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी दिया धुरी ही विद्यार्थिनीने इंग्रजी माध्यम मधून तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. ७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत दियाने १०० पैकी ८७ गुण मिळवुन तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला असून तिने ब्रँझ मेडल प्राप्त केले आहे. दियाला…

Read Full News

गडमठ गावठण येथे ४ एप्रिलला रक्तदान शिबिराचे आयोजन…

मोफत नेत्र तपासणी करीत मार्गदर्शन सुद्धा केले जाणार.. वैभववाडी प्रतिनिधीह्युमन राईटस् असोशिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली आणि एकदंत फुड ॲन्ड बेव्हरेजिस (ऑरबेलो) यांच्या संयुक्त विद्यमाने कै.सौ.शिला शंतनू बांदिवडेकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गुरूवार दि. ४ एप्रिल २०२४ रोजी स.१० वा भव्य रक्तदान शिबीर व मोफत नेत्रतपासणी…

Read Full News

कट्टा प्राथमिक शाळेचा शतक उत्सव ७ एप्रिल पासून…

देवगडदेवगड तालुक्यातील कट्टा येथील प्राथमिक शाळेला १०० वर्षे पूर्ण होत असून या शाळेचा शताब्दी सोहळा सर्व माजी विद्यार्थ्यांसमवेत ७ व ८ एप्रिल २०२४ असे दोन दिवस साजरा होणार आहे त्यासाठी माजी विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था करण्यात येणार असून दोन दिवसांच्या या सोहळ्यात मान्यवरांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे, प्रदर्शन व मनोरंजन, विविधांगी कार्यक्रम सादर केले जाणार आहेत….

Read Full News

संविधानिक विचारमंच यांच्यावतीने 14 रोजी जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा…

देवगड(प्रतिनिधी)सांविधानिक विचारमंच देवगडच्‍या वतीने देवगड तहसिलदार कार्यालयाच्‍या नजिकच्‍या पटांगणात छ शिवाजी महाराज,महात्‍मा ज्‍योतिराव फुले आणि विश्‍वरत्‍न्‍ डॉ.बाबाहेब आंबेडकर १४ एप्रिलरोजी जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्‍ताने जिल्‍हास्‍तरीय खुली निबंध स्‍पर्धा आयोजीत करण्‍यात आली आहे. या निबंध स्‍पर्धेसाठी भारतीय संविधानाची ७५ वर्षे आणि स्‍त्रीजीवनाचे परिवर्तन, दि प्रॉब्‍लेम रूपीची १०० वर्षे आणि समाजाचे अर्थकारण, भारतीय संविधान…

Read Full News

जामसंडे विद्यामंदिर येथे प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न…

नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागत.. देवगड(प्रतिनिधी)आदर्श शाळा जोशी विद्यामंदिर जामसंडे येथे १एप्रिल रोजी येथे२०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सन २०१५-१६ पासून इयत्ता पाहिलीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. त्यामुळे या प्रशालेची पटसंख्या वर्षानुवर्षे वाढत आहे.सदर कार्यक्रमाणात मुलांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन…

Read Full News

आंबोली हिरण्यकेशी फाटा येथे दुचाकी इनोव्हा ला धडकली…

आंबोली,ता.१; हिरण्यकेशी फाटा येथे समोरून लाईट पडल्याने दुचाकी उभ्या असलेल्या इनोव्हा कार ला धडकली. दुचाकी स्वार मुळवंदवाडी येथील सहदेव परब हे जखमी झाले.चेहऱ्याला व छातीला दुखापत झाली आहे.त्यांना आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.डॉ महेश जाधव डॉ.आदिती पाटकर यांनी उपचार केल्यानंतर सावंतवाडी रुग्णालयात नेण्यात आले.पोलिसांनी ही पाहणी केली.

Read Full News

You cannot copy content of this page