मालवण गवंडीवाडा येथे ७ रोजी रक्तदान शिबीर…

⚡मालवण ता.०२-: मालवण गवंडीवाडा येथील श्री राम मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त रविवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page