देवगड
देवगड तालुक्यातील कट्टा येथील प्राथमिक शाळेला १०० वर्षे पूर्ण होत असून या शाळेचा शताब्दी सोहळा सर्व माजी विद्यार्थ्यांसमवेत ७ व ८ एप्रिल २०२४ असे दोन दिवस साजरा होणार आहे त्यासाठी माजी विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था करण्यात येणार असून दोन दिवसांच्या या सोहळ्यात मान्यवरांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे, प्रदर्शन व मनोरंजन, विविधांगी कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
अशी माहिती कट्टा शताब्दी सोहळा समितीचे अध्यक्ष डॉ गणेश उर्फ भाई बांदकर यांनी बोलताना दिली. कट्टा शाळा शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यानिमित्त रविवार दिनांक ७ एप्रिल २०२४ आणि सोमवार दिनांक ८ एप्रिल २०२४ या दोन दिवशी सरस्वती पूजन, माजी विद्यार्थ्यांचे मनोगत, श्री सत्यनारायण महापूजा, मान्यवरांचे सत्कार, मनोगत, प्रदर्शन, हळदीकुंकू समारंभ, मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचे सत्कार, गप्पा टप्पा ज्येष्ठांचे चरित्र वाचन, तसेच काव्य संमेलन, आरोग्य मार्गदर्शन, नवीन विद्यार्थ्यांचे सत्कार, विद्यार्थी मनोगत ,माजी शिक्षकांचे सत्कार, कार्यशील विद्यार्थ्यांचे सत्कार, कथा ,प्रवचन भजन, सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक विद्यार्थ्यांचे चर्चासत्र व यासोबतच मनोरंजनाच्या अन्य कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाई बांदकर यांनी यावेळी बोलताना दिली. देवगड परिसरातील हजारोंच्या संख्येने विद्यार्थी ज्ञान घेऊन या कट्टा शाळेतून सन्मार्गाला लागले म्हणूनच या शाळेचा शताब्दी सोहळा सर्व माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी करण्याचे योजिले आहे. कट्टा शाळेचे माजी मुख्याध्यापक शिक्षक ,विद्यार्थी असे १०० वर्षातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सहभागाने व योगदानाने हा सोहळा संपन्न करण्याचे योजिले असून १९२४ या शाळेची उभारणी झाली या १०० वर्षातील एकूण २२०० विद्यार्थ्यांच्या नोंदी या शाळेत मिळाल्या त्या सर्वांना निमंत्रित करण्यात आले असून ८५ वर्षे वयापासूनच्या माजी विद्यार्थ्यांपासून आता शिकत असलेल्या पाच वर्षाच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वजण या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी भोजन निवास व्यवस्थेबरोबर विविध कार्यक्रमांची मेजवानी दिली जाणार आहे. तसेच चर्चासत्र मुलाखती आणि त्याचबरोबर नागेश कडू संगीत संयोजित धमाल विनोदी आर्केस्ट्रा शाळा सुटली पण पाटी नाही फुटली या कार्यक्रमात प्रत्येक माजी मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले .
या पत्रकार परिषदेस
डाॅ. भाई बांदकर
अध्यक्ष : उत्सव समिती
जगन्नाथ कोयंडे
खजिनदार
डाॅ. कृष्णा बांदकर
कार्यक्रम संयोजक
मनोहर कोयंडे
सहकार्यवाह
सौ. सिमा तारकर
मिरवणूक व्यवस्था
सदस्य
प्रकाश कोयंडे
दयानंद शेडगे
संतोष जुवाटकर
सौ.अस्मिता वालावलकर उपस्थित होते .
