संविधानिक विचारमंच यांच्यावतीने 14 रोजी जिल्हास्तरीय खुली निबंध स्पर्धा…

देवगड(प्रतिनिधी)
सांविधानिक विचारमंच देवगडच्‍या वतीने देवगड तहसिलदार कार्यालयाच्‍या नजिकच्‍या पटांगणात छ शिवाजी महाराज,महात्‍मा ज्‍योतिराव फुले आणि विश्‍वरत्‍न्‍ डॉ.बाबाहेब आंबेडकर १४ एप्रिलरोजी जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्‍ताने जिल्‍हास्‍तरीय खुली निबंध स्‍पर्धा आयोजीत करण्‍यात आली आहे. या निबंध स्‍पर्धेसाठी भारतीय संविधानाची ७५ वर्षे आणि स्‍त्रीजीवनाचे परिवर्तन, दि प्रॉब्‍लेम रूपीची १०० वर्षे आणि समाजाचे अर्थकारण, भारतीय संविधान आणि स्‍त्री शक्‍ती, आरक्षण आणि सामाजिक परिवर्तन,फुल्‍यांची पहिली शाळा आणि आजचे स्‍त्री शिक्षण असे पाच विषय देण्‍यात आले आहेत.
या स्‍पर्धेतील विजेत्‍यांना प्रथम क्रमांकासाठी रोख रूपये ५०००/-सन्‍मान चिन्‍ह, प्रशस्तिपत्रक, प्रशस्तिपत्रक, व्दितीय क्रमांकासाठी रोख रूपये ३०००/-सन्‍मान चिन्‍ह, प्रशस्तिीपत्र, तृतीय क्रमांकासाठी रोख रूपये २०००/-सन्‍मान चिन्‍ह आणि रोख रूपये १०००/-सन्‍मान चिन्‍ह, प्रशस्तिपत्रक अशी उत्‍तेजनार्थ तीन बक्षीसे दिली जाणार आहेत. निबंध स्‍पर्धेत भाग घेऊ इच्‍छीना-यांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा तरी या निबंध स्‍पर्धेत जास्‍तीत
या स्‍पर्धेत सहभागी होणा-या स्‍पर्धकांनी आपले लेखन साहित्‍य दिनांक १२ एप्रिल, २०२४पर्यत सचिन जाधव (९४२११८९३६९), डॉ.प्रा.निलेश वानखडे (८३७८८५७४२४) यांच्‍याशी संपर्क साधून जमा करावयाचे आहे. निबंध स्‍पर्धेबाबतचे नियम अटी,शर्ती बाबत जाणून घेण्‍यासाठी विचारमंचाचे सचिव दिलीप कदम(९३५६६१७१३६) राजेश साळसकर(९७६४८७७९८४) यांच्‍याशी संपर्क साधण्‍याचे व जास्‍तीत जास्‍त स्‍पर्धकांनी सहभाग घेण्‍याचे आवाहन अध्‍यक्ष के.एस.कदम प्रसिध्‍दी पत्रकातून केले आहे.

You cannot copy content of this page