Headlines

Global Maharashtra Breaking News

जीवनात ध्येय, उद्दिष्ट ठेऊन वाटचाल केली तर यशाचे शिखर गाठाल…

डॉ. नितीन देशपांडे: पुरस्कार सोहळा वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न.. ⚡मालवण ता.२७-: आयुष्यात आपणाला काय व्हायचे आहे याविषयी विद्यार्थ्यांनी आपल्या मनामध्ये ठाम ध्येय ठेऊन वाटचाल करणे गरजेचे आहे. जीवनात ध्येय, उद्दिष्ट ठेऊन वाटचाल केली तर अनेक मार्ग उपलब्ध होतील आणि हे मार्गच यशाचे शिखर गाठण्यासाठी उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन पुणे येथील शिक्षणप्रेमी डॉ. नितीन देशपांडे यांनी…

Read Full News

बांदा मराठा समाजातर्फे ३० रोजी गुणगौरव सोहळा कार्यक्रमाच आयोजन…

⚡बांदा ता.२७-: बांदा मराठा समाजातर्फे दशक्रोशीतील मराठा समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदवीका व इतर विषयात प्रविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम रविवार दिनांक ३० जुन रोजी बांदा ग्रामपंचायत सभागृह येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यासाठी सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे, मराठा समाज बांदा समन्वयक मकरंद तोरसकर,…

Read Full News

बांदा शहरात विजेचा वारंवार लपंडाव सुरु असल्याने भाजप आक्रमक…

जावेद खतीब व बाळु सावंत यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण च्या कार्यालयाला घेराव;दोन दिवसात समस्या मार्गी लावू; अधिकाऱ्यांच आश्वासन.. ⚡बांदा ता.२७-: बांदा शहरातील विजेच्या समस्याबाबत आज भाजपचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब व उपसरपंच बाळु सावंत यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता एस आर कोहळे यांना घेरावो घालत जाब विचारण्यात आला. यावेळी येत्या दोन दिवसात महावितरणच्या वरिष्ठ…

Read Full News

छ. शाहू महाराज जन्म दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न…

वैभववाडी ता.२७कोल्हापूर संस्थानचे अधिपती लोकराजा छ.शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन तसेच जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग, पोलीस ठाणे वैभववाडी आणि नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी महाविद्यालय, दत्त मंदिर, संभाजी चौक ते…

Read Full News

आ राणेंच्या संकल्पनेतून कोकीसरे जिल्हा परिषद मतदार संघातील महिलांसाठी देवदर्शन…

वैभववाडी ता.२७-: आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून कोकिसरे जि. प. मतदार संघातील महिलांकरीता श्री बाळूमामा आदमापुर, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट आणि श्री विठ्ठल रखुमाई पंढरपूर दर्शन यात्रेकरीता मोफत बस सोडण्यात आल्या. गुरुवारी सकाळी वैभववाडी येथून माजी सभापती अरविंद रावराणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून त्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, नगराध्यक्ष…

Read Full News

देवगड तालुक्यात वादळी वाऱ्याने सुमारे एक लाख दहा हजाराचे नुकसान…

वादळाचा जास्त फटका मूळबांध वाडा गावालामणचे येथे डोंगराचा दगड पडला घरावर:सुदैवाने अनर्थ टळला… ⚡देवगड ता.२७-: देवगड तालुक्यात गुरूवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांची पडझड होऊन सुमारे एक लाख दहा हजाराचे नुकसान झाले आहे.या पडझडीचा जास्त फटका वाडा मुळबांध व मणचे गावाला बसला आहे. देवगड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून वादळी वाऱ्यासह मुसळधार झालेल्या पावसामुळे…

Read Full News

नविन पिढीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा…

गणेश कुशे:दीपक केसरकर मित्रमंडळाच्यावतीने शालेय मुलांना केले शैक्षणिक साहित्य वाटप… ⚡वेंगुर्ला ता.२७-: जीवनात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्याला अथक परिश्रम करावेच लागतील, तरच आपण यशाच्या राजमार्गावर पूढे जावू. नविन पिढीने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था फोंडाघाटचे उपाध्यक्ष गणेश कुशे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात उपस्थित सर्व…

Read Full News

रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन अध्यक्षपदी रो.योगेश नाईक…

तर सेक्रेटरी पदी रो.ॲड. प्रथमेश नाईक: उपस्थितांकडून अभिनंदन… ⚡वेंगुर्ले ता.२७-: रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनची सन २०२४-२५ साठी नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी नाईक ॲग्रो एजन्सी चे प्रोप्रायटर, रो.योगेश नाईक यांची निवड केली आहे. सचिवपदी ॲड. रो.प्रथमेश नाईक, उपाध्यक्षपदी रो.मृणाल परब तर खजिनदार पदी रो.मुकूल सातार्डेकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. रोटरी क्लब…

Read Full News

कुडाळ मध्ये २९ जूनला ‘उमंग’ करियर मार्गदर्शन मेळावा…

रोटरी क्लब कुडाळ, एमकेसीएल आणि सिंधू संकल्प अकॅडमी यांचा उपक्रम:जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक,तहसीलदर आणि तज्ज्ञाची उपस्थिती.. ⚡कुडाळ ता.२७-: रोटरी क्लब, कुडाळ, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित म्हणजेच एमकेसीएल आणि सिंधू संकल्प अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने.. शनिवार दिनांक 29 जून 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘उमंग हा मोफत करियर मार्गदर्शन मेळावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे. कुडाळ…

Read Full News

You cannot copy content of this page