विद्यार्थ्यांनी ई लायब्ररी विभागाचा फायदा घ्यावा…
मार्तंड सावंत:विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर आपल्या विकासासाठी करायला हवा… ⚡वेंगुर्ला ता.१३-: नगर वाचनालयाने सुरू केलेला ई लायब्ररी विभाग हा एमपीएससी, यूपीएससी अशा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेऊन मोठे अधिकारी बनावे असे उद्गार मायक्रोटेक कॉम्प्युटरचे संचालक मार्तंड सावंत यांनी उद्घाटनप्रसंगी काढले.
