समाज सुधारक कै. रावबहादुर सि. के. बोले यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रदर्शीत व्हावे…

गुरुनाथ मिठबावकर यांनी वेधले केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे लक्ष..

⚡मालवण ता.३१-: भंडारी समाजातील सुप्रसिध्द समाज सुधारक कै. रावबहादुर सि. के. बोले यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रदर्शित करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी भंडारी समाज दादरचे अध्यक्ष गुरुनाथ मिठबावकर यांनी भंडारी समाजाचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे केली आहे.

भंडारी मंडळ दादरचे अध्यक्ष गुरुनाथ मिठबावकर यांनी रत्नागिरी येथे झालेल्या भंडारी महासंघाच्या महाधिवेशनात केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन सुप्रसिध्द समाज सुधारक कै. रावबहादुर सि. के. बोले. यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रदर्शित करण्याबाबतचा भंडारी मंडळ दादरचा प्रस्ताव आणि निवेदन सादर केले.

स्वातंत्र्यपूर्व कालीन ब्रिटीश राजवटीत जे अग्रणी नेते होऊन गेले, त्यामध्ये समाज सुधारक कै. रावबहादुर सिताराम केशव बोले उर्फ बाबासाहेब बोले हे एक अग्रणी नेते होते. समतेचे राज्य निर्मितीसाठी अस्पृश्यता निवारणाचा पहिला प्रस्ताव कै. रावसाहेब बाबासाहेब बोले यांनी दि. ४ ऑगस्ट १९२३ रोजी त्यावेळच्या विधिमंडळात मांडून अस्पृश्य बांधवाना सार्वजनिक पाणवठे, धर्मशाळा, विद्यालये, न्यायालय ह्या सार्वजनिक ठिकाणी मुक्त प्रवेश मिळावा असा प्रथम ठराव आणून सामाजिक समतेच्या चळवळीस चालना दिली. या घटनेला आता १०० वर्षे झाली. त्यांच्या या महान कार्याचा गौरव व स्मृति म्हणून टपाल टिकीट प्रदर्शित करणेबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा आणि अशा या समाज सुधारक नेत्याचा मरणोतर सन्मान करावा, अशी मागणी गुरुनाथ मिठबावकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page