Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी येथे २४ डिसेंबर रोजी कथाकथन स्पर्धा…

सानेगुरुजी जयंती निमीत्त श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडीच्यावतीने आयोजन.. ⚡सावंतवाडी : सहदेव राऊळ : श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन सावंतवाडीच्यावतीने मंगळवार २४ डिसेंबर रोजी पू. सानेगुरुजी जयंती निमीत्त सकाळी १०.०० वाजता श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथेद. कृ. वाडकर कृतज्ञता निधी सावंतवाडी तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडीच्यावतीने सावंतवाडीचे…

Read Full News

आरोंदा येथील व्हॉलीबॉल स्पर्धेत मांद्रे गोवा विजेता तर चिवला बीच मालवण उपविजेता…!

⚡सावंतवाडी ता.०८-: आरोंदा येथे श्री देव राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळ देऊळवाडी यांनी आयोजित केलेल्या व अमेय आरोंदेकर यांनी पुरस्कृत केलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. श्री देव राष्ट्रोळी कला क्रीडा मंडळ देऊळवाडी आयोजित सिंधुदुर्ग व गोवा मर्यादित भव्य दिव्य प्रकाश झोतातील हॉलीबॉल स्पर्धा ३०नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेतील प्रथम…

Read Full News

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गणित ऑलिम्पिक मध्ये नेत्रदीपक यश…!

⚡कुडाळ ता.०८-: कुडाळ येथे अध्ययन संस्थेच्या वतीने शालेय गणित सुधार उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या त्रिकोणमिती आणि अपूर्णांक या विषयांवर आधारित गणित ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि आपली गुणवत्ता सिद्ध केली. या स्पर्धेत कुडाळमधील अनेक नामांकित शाळांचा समावेश होता.कुडाळमधील नऊ शाळांच्या सहभागाने रंगलेल्या…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेला ताकद देणार…

आदित्य ठाकरे:युवा सेना पदाधिकाऱ्यांनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट.. ⚡कुडाळ ता.०८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे काम जोमाने सुरू असुन या पुढच्या काळात युवासेनेला मजबूत ताकद देणार असल्याची ग्वाही युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवासेना ही युवा सेनेचे पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जबरदस्त नेतृत्वाखाली काम…

Read Full News

प्रोअॅक्टिव्ह अबॅकस, वैदिक गणित विभागीय स्पर्धेत कणकवली सेंटरचे यश…!

⚡कणकवली ता.०८-: कोल्हापूर येथे झालेल्या अबॅकस स्पर्धेत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा या जिल्ह्यातून एकूण १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. यात कणकवली सेंटरचा वेदांत गुरव व फरहीन बटवाले हे विद्यार्थी ५ मिनिटात १०० पैकी १०० गुण मिळवत पहिले आले. तर पार्थ तेली व चैतन्य टायशेटे यांनी ९९ गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला. अवनी बावकर हिने आपल्या…

Read Full News

दोन्ही राणे बंधूंच्या मध्यस्थीमुळे सेवेतून कमी केलेल्या त्या वीज कर्मचाऱ्यांना घेतले पुन्हा सेवेत…

कंत्राटी कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत यांनी दोन्ही आमदार राणे बंधुचे वेधले होते लक्ष… मालवण दि प्रतिनिधीविधानसभेचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे आणि आमदार निलेश राणे या द्वयीनी निवडून आल्यानंतर विकास कार्याचा शुभारंभ करतानाच राणेबंधुंच्या या डबल इंजिनचा पहिला फायदा जिल्ह्यातील कंत्राटी वीज कामगारांना झाला आहे. आयटीआय इलेक्ट्रिकल, वायरमन डिग्री नसलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेतून काढून टाकण्याचा…

Read Full News

मालवण नगरपालिकेकडून मालवण आगाराला बायोटॉयलेट उपलब्ध…!

⚡मालवण ता.०७-: मालवण एसटी स्थानक परिसरातील स्वच्छतागृहाची दुरावस्था होऊन स्वच्छता गृहाची सोय नसल्याबद्दल प्रवासी वर्ग व नागरिकांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे तक्रारी मांडल्यानंतर मालवण शहर भाजपच्यावतीने मालवण आगार व मालवण नगरपालिका यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून मालवण नगरपालिकेने बस स्थानक परिसरात बायोटॉयलेट उपलब्ध करून दिले आहे गेली काही वर्षे मालवण बस स्थानकाच्या नव्या इमारतीचे काम सुरु असून…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे प्लास्टिक जप्तीची कारवाई…!

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ७ डिसेंबर रोजी चार फिरत्या पथकांद्वारे शहरातील स्थानिक व्यापारी, फळविक्रेते, फुलविक्रेते, मच्छविक्रेते, किराणा दुकाने, बेकरी, पानपट्टी स्टॉल अशा २६ जणांवर प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. यात ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या अंदाजे ५ किलो एवढ्या वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त करून प्रती ५०० रूपये याप्रमाणे १२ हजार ७००…

Read Full News

गद्दार सदा सरवणकर यांचा माज उतरवायचा होता तो उतरवला …

आमदार महेश सावंत; उद्धव ठाकरे यांनी कोकणची जबाबदारी दिली तर नक्कीच स्वीकारेनच,नाही दिली तरीही इथल्या शिवसैनिकांना ताकद देईन ⚡सावंतवाडी ता.०७-: बाळासाहेब ठाकरेंनी ज्या दगडाला शेंदूर फासला त्या ३० वर्ष राजकारणात असलेल्या सदा सरवणकर यांचा माज उतरवायचा होता. तो माज उतरवला, मागचा हिशोब चुकता झाला. गद्दारीचा शाप शिवसैनिकांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुसून टाकला असे मत नवनिर्वाचित…

Read Full News

सावंतवाडी पत्रकार बंधू-भगिनींसह कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ९ डिसेंबर ला आयोजन…!

⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी तालुक्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता करण्यात आले आहे . सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये होणाऱ्या या आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन:सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री उमेश तोरस्कर यांच्या हस्ते होणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार श्री अभिमन्यू लोंढे हे असणार आहेत….

Read Full News

You cannot copy content of this page