बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे गणित ऑलिम्पिक मध्ये नेत्रदीपक यश…!

⚡कुडाळ ता.०८-: कुडाळ येथे अध्ययन संस्थेच्या वतीने शालेय गणित सुधार उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या त्रिकोणमिती आणि अपूर्णांक या विषयांवर आधारित गणित ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि आपली गुणवत्ता सिद्ध केली. या स्पर्धेत कुडाळमधील अनेक नामांकित शाळांचा समावेश होता.
कुडाळमधील नऊ शाळांच्या सहभागाने रंगलेल्या त्रिकोणमिती ऑलिम्पिक मध्ये बॅ. नाथ पै स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले. यात निरंजन कुशे (इयत्ता 9वी) आणी मनस्वी परब (इयत्ता 8वी) यांनी या स्पर्धेत विशेष कौशल्य दाखवत शाळेच्या यशाचा झेंडा रोवला. तसेच अपूर्णांक ऑलिम्पिकमध्ये कुडाळमधील 5 शाळांचा सहभाग होता. बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी येथेही आपली सरस कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला, यात मानव तवटे (इयत्ता 6 वी) आणि वेदांत शृंगारे (इयत्ता 7 वी) यांनी आपल्या अचूक उत्तरांनी परीक्षकांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेच्या गणित शिक्षिका प्राची बर्वे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या गौरवशाली यशाबद्दल संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर , प्राचार्या चैताली बांदेकर, तसेच इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page