सावंतवाडीत अमेय तेंडोलकर गोविंदा पथकाने फोडली मानाची दहीहंडी…
सावंतवाडी : गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात थरारक थर लावत सावंतवाडीतील गोविंदांनी दहीहंडी उत्सव साजरा केला. अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदापथकाच्या माध्यमातून मुरलीधर मंदिरासमोरील मानाची दहिहंडी फोडत शहरातील उर्वरित हंड्या फोडण्यात आल्या. गोविंदांचा हा थरार याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी व दहीहंडीचा हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सालईवाडा येथील श्री पडते यांच्या निवासस्थानी…
