Headlines

Global Maharashtra Breaking News

सुजाता गोसावी, बाळकृष्ण गोसावी जल शक्ती मंत्रालयाच्यावतीने होणार सत्कार…

बचतगटाच्या माध्यमातून जल जीवन मिशनसाठी केलेल्या कामाची घेतली दखल.. सिंधुदुर्गनगरी ता २०बचत गटाच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत विशेष कार्य केल्याबद्दल वेंगुर्ला म्हापण येथील श्रीम सुजाता बाळकृष्ण गोसावी यांना जल शक्ती मंत्रालय नवी दिल्ली यांच्या माध्यमातुन नवी दिल्ली येथे आयोजित दिनांक २३ ते २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरीता विशेष निमत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती…

Read Full News

भोसले इन्स्टिटयूट आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार…

उद्योजकता वाढीसाठी केले जाणार एकत्रित प्रयत्न…. ⚡सावंतवाडी ता२०-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र या दोन संस्थांमध्ये उद्योजकता वाढीसाठी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये उद्यमी वृत्ती वाढवणे व स्वयंरोजगाराला चालना देणे हे या कराराचे मुख्य उद्दिष्ट आहे. याकरिता दोन्ही संस्था एकत्रितपणे उपक्रम राबवतील. यामध्ये उद्योजकता विकास कार्यशाळा, व्याख्यानमाला,…

Read Full News

वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री.अनिल मोरे यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.२०-: मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकण रेल्वे मार्गावर नेहमीसाठी वसई सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्यासाठी ह्या प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली. प्रवासी संघटनेची सर्वसाधारण सभा व कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते साहेब यांचा जन्मशताब्दी सोहळा समारोप रविवार दिनांक १९ जाने. २०२५ रोजी सायं. ३.३० वा. राजा शिवाजी विद्यालय नालासोपारा या ठिकाणी पार पडला. यावेळी…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द…

पालकमंत्री नितेश राणे:कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य;दरडोई उत्पन्न वाढविणार.. ⚡सिंधुदुर्ग दि.२०-: जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगारावाढीसाठी देखील प्रयत्न करणार. प्रत्येक विभाग हा जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणे आवश्यक आहे. ‍जनतेची कामे वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असल्याने सामान्य नागरिकांना कामासाठी कार्यालयात चकरा माराव्या…

Read Full News

निरवडे येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री लक्ष्मीनारायण वालावल संघ ठरला मानकरी….

⚡सावंतवाडी,ता.२०-: निरवडे येथील श्री देव महापुरुष कला क्रिडा मंडळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी श्री लक्ष्मीनारायण वालावल संघ ठरला. तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पंचक्रोशी फोंडा यांनी पटकाविले. तर तृतीय क्रमांक पंचक्रोशी जामसंडे देवगड, चतुर्थ क्रमांक शिवदैवत शिवदैवत नेरूरपार यांना मिळाले. या स्पर्धेला जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा…

Read Full News

मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे कणकवलीत जंगी स्वागत…

पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री ना. नितेश राणे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्यावर जल्लोषी स्वागत.. ⚡कणकवली ता.२०-: मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर पहिल्यांदाच आलेले असताना कणकवली येथील श्रीधर नाईक चौकात पुष्पगुच्छा देऊन त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेमुळे राणे कुटुंबिय महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहोत…

पालकमंत्री ना. नितेश राणे:चिपी विमानतळ बाबत लवकरच गोड बातमी मिळणार असल्याचा व्यक्त केला विश्वास.. ⚡कणकवली ता.२०-: सिंधुदुर्गच्या जनतेमुळे आम्ही राणे कुटुंबीय महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेचा सेवक म्हणून मी करेन अस सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, सिंधुदुर्गच्या जनतेने जेवढे आशीर्वाद…

Read Full News

मुक्ताई ॲकेडमीच्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेला विदयार्थ्यांचा मोठा प्रतिसाद…!

⚡सावंतवाडी ता.२०-: मुक्ताई ॲकेडमीने कै.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ 14 वर्षाखालील विदयार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत मुला-मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.पहीली ते आठवीच्या चौ-याहत्तर स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. स्पर्धेचे आयोजन सावंतवाडीतील श्री.पंचम खेमराज महाविदयालय येथे करण्यात आले.स्पर्धेचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री.जयप्रकाश सावंत, कोकण लाईव्ह न्युज चॅनेलचे संपादक…

Read Full News

एल एल एम परीक्षेत नैपुण्य प्राप्त करणाऱ्या त्रिपुरा नेरुरकर हिने लंडनमध्ये मालवणचे नाव केले रोशन…

⚡मालवण ता.१९-:मूळ मालवणच्या रहिवाशी असणाऱ्या आणि मुंबई दादर येथे राहणाऱ्या कु. त्रिपुरा संजय नेरुरकर या मालवणच्या कन्येने लंडन येथील ब्रूनेल युनिव्हर्सिटीची वकिली क्षेत्रातील एलएलएम पदविका संपादन करून लंडनमध्ये मालवणचे नाव रोशन केले आहे. मूळ मालवणची रहिवाशी असणारी कु. त्रिपुरा संजय नेरुरकर ही आपले वडील संजय नेरुरकर आणि कुटूंबासमवेत मुंबई दादर येथे राहते. तिने मुंबई दादरच्या…

Read Full News

मालवणमध्ये राष्ट्र सेविका समितीतर्फे पथसंचलन…

⚡मालवण ता.१९-:राष्ट्र सेविका समिती सिंधुदुर्ग जिल्हातर्फे मालवणात सघोष पथसंचलन व मकर संक्रमण उत्सव साजरा झाला. यानिमित्त मालवण शहरातून उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने सघोष पथसंचलन करण्यात आले. यामध्ये जिल्हाभरातील ९३ राष्ट्रसेविका महिला सहभागी झाल्या होत्या. राष्ट्र सेविका समिती ही अखिल भारतीय महिला संघटना आहे. लक्ष्मीबाई केळकर यांनी २५ ऑक्टोबर १९३६ रोजी राष्ट्र सेविका समितीची स्थापना…

Read Full News

You cannot copy content of this page