सुजाता गोसावी, बाळकृष्ण गोसावी जल शक्ती मंत्रालयाच्यावतीने होणार सत्कार…

बचतगटाच्या माध्यमातून जल जीवन मिशनसाठी केलेल्या कामाची घेतली दखल..

सिंधुदुर्गनगरी ता २०
बचत गटाच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत विशेष कार्य केल्याबद्दल वेंगुर्ला म्हापण येथील श्रीम सुजाता बाळकृष्ण गोसावी यांना जल शक्ती मंत्रालय नवी दिल्ली यांच्या माध्यमातुन नवी दिल्ली येथे आयोजित दिनांक २३ ते २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरीता विशेष निमत्रित करण्यात आले आहे. अशी माहिती जल जीवन मिशन , जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे प्रकल्प संचालक विशाल तनपुरे यांनी दिली.

वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण येथील श्रीम सुजाता बाळकृष्ण गोसावी, यानी आपल्या बचत गटाच्या माध्यमातुन जल जीवन मिशन अंतर्गत गावातील नळपाणी योजना चालविण्यास घेतली आहे. या योजनेचे पाणी सोडणे, पाईप लाईन दुरुस्ती, नळ जोडनी, पाणीपट्टी वसुली आदि कामे त्या बचत गटाच्या माध्यमातुन करतात. यामुळे बचतगटाला आर्थिक फायदा झाला आहे. याची दखल घेत वेंगुर्ला म्हापण येथील श्रीम सुजाता बाळकृष्ण गोसावी व त्याचे पती बाळकृष्ण सिताराम गोसावी यांना २३ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्याकरीता विशेष निमत्रित करण्यात आले आहे. अशी माहीती विशाल तनपुरे, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन तथा जिल्हा समन्वयक, स्वच्छ भारत मिशन (ग्रा) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी दिली .

You cannot copy content of this page