⚡मालवण ता.१९-:
मूळ मालवणच्या रहिवाशी असणाऱ्या आणि मुंबई दादर येथे राहणाऱ्या कु. त्रिपुरा संजय नेरुरकर या मालवणच्या कन्येने लंडन येथील ब्रूनेल युनिव्हर्सिटीची वकिली क्षेत्रातील एलएलएम पदविका संपादन करून लंडनमध्ये मालवणचे नाव रोशन केले आहे.
मूळ मालवणची रहिवाशी असणारी कु. त्रिपुरा संजय नेरुरकर ही आपले वडील संजय नेरुरकर आणि कुटूंबासमवेत मुंबई दादर येथे राहते. तिने मुंबई दादरच्या बाळासाहेब आपटे महाविद्यालयात वकिली क्षेत्रातील एलएलबी चे शिक्षण पूर्ण करून ती पुढील शिक्षणासाठी लंडन येथे गेली होती. तिने लंडन येथील ब्रुनेल युनिव्हर्सिटीत एलएलएम पदविकेच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. या परीक्षेत तिने चांगले नैपूण्य संपादन करीत लंडनमध्ये मालवणचे नाव रोशन केले आहे. एलएलएम पदविका धारण केल्यानंतर लंडन (यू. के) येथे एका कंपनीमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत आहे. मालवणचे माजी नगरसेवक आणि मालवण व्यापारी संघांचे अध्यक्ष श्री. उमेश नेरुरकर यांची तसेच कुडाळ येथील मे. राजाराम बाबुराव नेरुरकर ज्वेलर्सचे विजय नेरुरकर यांची कु. त्रिपुरा ही पुतणी तर मुंबई दादर येथील मे. राजाराम बाबुराव नेरुरकर ज्वेलर्सचे संजय नेरुरकर यांची ती कन्या आहे. कु. त्रिपुरा हिच्या या यशाबद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
