Global Maharashtra Breaking News

रोजगारासाठी मुंबईत गेलेल्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू…

विशाल परब यांच्याकडून मदतीचा हात… ⚡वेंगुर्ले ता.०७-: तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी येथील सर्वेश सुरेश गावडे हा कोकणातील अन्य तरुणांप्रमाणे रोजगारासाठी मुंबईत जाऊन कुटुंबाला हातभार लावण्यासाठी धडपडणारा युवक. वडिलांचा दीड वर्षांपूर्वी अचानक मृत्यू झाल्याने घरची जबाबदारी आणखीनच वाढलेली. घरची परिस्थिती सुधारण्यासाठी काकांकडे रहात आयटीआय करून ठाण्यात एका खाजगी कंपनीत ॲप्रेन्टीसशिप करून नोकरीत कायम होणार अशी स्थिती असतानाच,…

Read More

सरपंच सुयोगी घाडी यांना दिल्लीत ध्वजारोहणाला निमंत्रण …

⚡देवगड ता.०७-: वानिवडे गावचे सरपंच सुयोगी घाडी यांना १५ ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण राज्य सरकारकडून मिळाले आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सरपंच आहेत यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देवगड तालुक्यातील वानिवडे गावच्या सरपंच सुयोगी घाडी यांना भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने १५ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण कार्यक्रमात…

Read More

स्वातंत्र्यदिनी नवीन कुर्ली ग्रामस्थांचे कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन…

कणकवली : कणकवली तालुक्यातील नवीन कुर्ली पुनर्वसित गावातील प्रलंबित प्रमुख पाच समस्यांसाठी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण छेडण्याचा इशारा नवीन कुर्की प्रकल्पग्रस्त संघटनेच्यावतीने अध्यक्ष रवींद्र नवाळे, कार्याध्यक्ष हरेश पाटील, सचिव आनंद सावंत व अन्य ग्रामस्थांनी. दिला आहे. याबाबतचे ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन संघटनेतर्फे ना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले…

Read More

कार्यकारी अभियंतांमुळे कोट्यावधी केलेला खर्च वाया गेला…

या कामांची पहाणी बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण करणार का..?माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल.. कणकवली : रेल्वे स्टेशन विमानतळाप्रमाणे सुशोभिकरण केल्याची वा – वा कार्यकारी अभियंता, सर्व अधिकारी, पालकमंत्री दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये ठेकेदार, अधिकारी, मंत्री हे मालामाल होत आहेत. पण जनता रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वर पाऊसात भिजत गाड्या पकडतात, हे दुदैवी आहे….

Read More

बांदा नवीन मच्छी मार्केट इमारतीचे लोकार्पण सोहळा उद्या…

मंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती: सर्वांनी उपस्थित रहावे;भाजपचे बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांचे आवाहन. बांदा/प्रतिनिधीबांदा शहरातील आळवाडी येथे बांधण्यात आलेल्या नवीन मच्छी मार्केट इमारतीचे लोकार्पण गुरुवार दिनांक ८ रोजी दुपारी १२ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. उपस्थित राहण्याचे…

Read More

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेतसमर्थ पाटील राज्यात प्रथम…

⚡बांदा ता.०७-: अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ चा विद्यार्थी समर्थ सागर पाटील याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. यापूर्वी देखील समर्थ याने राज्यस्तरावर वेशभूषा, निबंध लेखन स्पर्धेत यश मिळविले आहे. त्याला प्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, वर्गशिक्षिका रसिका मालवणकर, आई वडील सौ. राणी सागर पाटील…

Read More

दिनेश गावडे यांच्या माध्यमातून सांगेली विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप…

आंबोली ता.०६-: सांगेली कनिष्ट विद्यालय व माध्यमिक विद्यालयला युवा नेते तथा शिंदे गटाचे पदाधिकारी श्री दिनेश गावडे यांच्या माध्यमातून आंबोली जिल्हा परिषद मतदार संघातील सांगली कनिष्ठ विद्यालय व माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान त्यांच्या या उपक्रमाचे शिक्षक पालक ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

Read More

बांधकाम कामगार कल्याणकारी महसंघाचाही उपोषणाचा इशारा…

कामगारांना दाखले देण्यास ग्रामसेवकांनी नकार दिल्याने संघटना संतप्त ओरोस ता ६-:ग्रामसेवक युनियनच्या चुकीच्या आदेशानुसार ग्रामसेवकांनी बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. याबाबत योग्य तो तोडगा काढून बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करावी. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार, असा इशारा बांधकाम कामगार कल्याणकारी महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष बाबल नांदोसकर, सहसचिव…

Read More

मळगाव घाटीत एसटी व लक्झरी बस मध्ये अपघात…

आज सकाळी साडेआठची घटना: एसटी मधील काही प्रवासी किरकोळ जखमी.. ⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडीच्या दिशेने येत असणारी एकटी मळगाव घाटीत समोरून येणारा लक्झरी बसणे धडक दिल्याने बाजू देताना सरंक्षण कटड्याला घासली.मात्र चालाकाचा प्रसंगावधान मोठा अनर्थ टळला.ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान मळगाव घाटीत ठिक ठिकाणी सरंक्षण भिंत…

Read More

नितेश राणेंनी वैभववाडी बस स्थानकाला भेट देऊन स्टंटबाजी केली…

सुशांत नाईक:विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नितेश राणे करतायत जनतेची फसवणूक.. वैभववाडी प्रतिनिधी    कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी बस स्थानकाला भेट देऊन स्टंटबाजी केली. एसटीचे विभागीय अधिकारी पाटील यांच्यावर आगपाखड केली. त्यामुळे हे सत्तेत आहेत की विरोधात आहेत असा प्रश्न इथल्या जनतेला पडला आहे. तुम्ही गेल्या दहा वर्षात आमदार म्हणून काय…

Read More
You cannot copy content of this page