Global Maharashtra Breaking News

राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूचं ; देवगड आगारात संमिश्र प्रतिसाद…

⚡देवगड ता.०४-: महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने ३ सप्टेंबर पासून धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता.या धरणे आंदोलनात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन देखील करण्यात आले होते.मात्र या संपामध्ये देवगड आगारातील ३० टक्के कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असून ७० टक्के सर्वसेवा सुरळीत सुरू असल्याचे एसटी स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर यांनी सांगितले. देवगड आगारातून…

Read More

मोंडतर येथील सुभाष चौघुले यांचे अपघाती निधन…!

⚡देवगड ता.०४-: मोंडतर वरची वाडी येथील रहिवाशी सुभाष गोपाळ चौघुले (६९ वर्षे) यांचे दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मुंबईतील दिवा येथे वाहनाची धडक बसून जागीच निधन झाले. अपघाताची बातमी मिळताच पोलिसांनी त्यांना ठाणे महापालिकेच्या शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर कल्याण येथील त्यांच्या निवासस्थाना…

Read More

गणेश चतुर्थीनिमित्त वैभववाडी बाजारपेठ गुरुवारी पूर्ण दिवस सुरू राहणार…

वैभववाडी प्रतिनिधीगणेश चतुर्थीनिमित्त वैभववाडी बाजारपेठ गुरुवारी पूर्ण दिवस सुरू असणार आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून तालुका व्यापारी संघटनेने हा निर्णय घेतला आहे अशी माहिती तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर यांनी दिली.तालुक्यातील मुख्य बाजारपेठ आठवडी बाजाराच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी दुपारनंतर बंद असते. मात्र या आठवड्यात बाजारपेठेतील सर्व दुकाने सुरू असणार आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त खरेदीसाठी येणाऱ्या…

Read More

सरकारने एष्टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या…

मंगेश तळवणेकर:गणेशोत्सव काळात होणारी प्रवाशांची गैरसोय टाळावी… ⚡सावंतवाडी ता.०४-: गणेश चतुर्थीला कोकणात येणाऱ्या चाकरमान्याची संख्या लक्षणीय असते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चाकरमान्यांना गावी येण्यास, गणेशोत्सवाच्या बाजाररहाटासाठी बाजारात येणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने एष्टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य…

Read More

पालकमंत्र्यांच्या हस्ते बीच क्लिनिंग मशीनचे लोकार्पण…!

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सीएसआर फंडातून विकत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला वितरीत केलेल्या बीच क्लिनिंग मशीनचे लोकार्पण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रभाकर सावंत, मुख्याधिकारी श्री नातु आदी उपस्थित होते. ह्या बीच क्लिनिंग मशीन जिल्हा परिषद ग्रामीण विभागासाठी दोन व नागरी विभागासाठी एक अशा एकूण 3 मशीन वेंगुर्ला,…

Read More

जिल्ह्यात पर्यटनवाढीला प्राधान्य…

पालकमंत्री रविंद्र चव्हाण:कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभिकरण लोकार्पण.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: आपल्या जिल्ह्याला पर्यटनाची परंपरा लाभलेली आहे. जिल्ह्यात पर्यटन वाढल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थलांतर थांबेल. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनवाढीला प्राधान्य देणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.

Read More

येत्या पुढील काळात तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने आपला कारभार सुधारावा…

आशिष सुभेदार:अन्यथा तीव्र आंदोलन करू.. ⚡सावंतवाडी ता.०४-: जिल्ह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे. प्रत्येक कामात टक्केवारी घेऊन मगच कामे केली जातात त्यामुळे कामांची गुणवत्ता राहत नाही. याची प्रचिती मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळा दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा आली असून यावर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा व मंत्र्यांचा कोणताही अंकुश नाही. येत्या पुढील काळात तरी…

Read More

भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतिने गणेश चतुर्थीनिमित्त उद्या दिव्यांगांना शिधा वाटप…

भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून दिव्यांगांना करणार शिधा वाटप.. ⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्लेत साईदरबार हाॅल मध्ये उद्या भाजपा दिव्यांग विकास आघाडी च्या वतीने दिव्यांगांना युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून गणपती निमित शिधावाटप करण्यात येणार आहे. तरी दिव्यांगांनी येताना आपले दिव्यांग सर्टिफिकेट सोबत घेऊन या शिधावाटपाचा लाभ घ्यावा , असे…

Read More

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या चेअरमन पदी अँड. संग्राम देसाई यांची निवड…

अँड.परिमल नाईक यांनी केल अभिनंदन… ⚡सावंतवाडी ता.०४-: बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या चेअरमन पदी अँड. संग्राम देसाई यांची निवड यांची निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अँड. परिमल नाईक यांच्या वतीने अभिनंदन व सत्कर करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आला. या प्रसंगी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे सर्व…

Read More

दोडामार्गात भजन साहित्याचे गुरुवारी वाटप…

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार वाटप.. ⚡दोडामार्ग ता.०४-: तालुक्यातील २०० भजन मंडळाना गुरुवारी (ता. ५) सकाळी ११ वाजता भजन साहित्याचे वाटप केले जाणार आहे.शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते साहित्य वाटप होईल.येथील बाजारपेठेतील परमेकर सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रत्येक भजन मंडळाने मंडळातील किमान पाच सदस्यांसह उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी…

Read More
You cannot copy content of this page