सुमेधा आराबेकर यांच्या कडूनसामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानालि35 हजाराचा धनादेश सुपूर्द…

⚡सावंतवाडी ता.२२-: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या सेवाभावी संस्थेच्या अनेक सामाजिक उपक्रमांना हातभार लावण्यासाठी दाते पुढे सरसावत आहेत.
श्रीमती सुमेधा अराबेकर यांचे पती
कै. प्रभाकर आराबेकर वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा बजावली होती म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नीच्या इच्छेनुसार रुग्णांसाठी रुग्णपोयोगी वस्तू खरेदी करण्या करिता 35 हजार रुपयाचा धनादेश त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान जवळ सुपूर्द केला. यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची शिफारस त्यांच्याजवळ केली होती तसेच कळसुलकर शाळेचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते दत्तप्रसाद गोटस्कर या सेवाभावी संस्थेचे नाव सुचवले होते या सर्वांचे मनःपूर्वक आभार रवी जाधव यांनी मानले.सदरच्या पैशांमध्ये लवकरात लवकर रुग्णपोयोगी वस्तू खरेदी त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी दिल्या जातील असे रवी जाधव यांनी सांगितले.

You cannot copy content of this page