Headlines

लाडक्या बहिणींची साथ मला…

संजू परब: मोठ्या मताधिक्याने मी निवडून येणार.. ⚡सावंतवाडी ता.३०-: प्रभाग ७ मध्ये भाजपच लक्ष जास्त आहे. पण, त्यांच स्वप्न स्वप्नच राहील. लाडक्या बहिणींची साथ मला आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार इथून मताधिक्य घेतील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला. प्रभाग ७ मधून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व स्नेहा नाईक मैदानात आहेत. श्री. परब…

Read Full News

मालवण विकासासाठी भाजप एकजूट…

शिल्पा खोत:उद्या मालवणात भाजपची भव्य रॅली.. ⚡मालवण ता.३०-: मालवण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांनी मालवण शहरात जी प्रचार यंत्रणा राबविली त्यामुळे घराघरात भाजपची कमळ ही निशाणी पोहोचविण्यात आम्हाला यश आले आहे. मालवण शहरात प्रचार यंत्रणा राबविताना शहरवासीयांनी जो उदंड प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. यामुळे या निवडणुकीत माझ्यासह भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असल्याचा…

Read Full News

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘स्पोर्ट्स मिट 2025’ उत्साहात संपन्न…

⚡सावंतवाडी ता.३०-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल आयोजित स्पोर्ट्स मिट 2025 हा बहुप्रतिक्षित क्रीडा महोत्सव आज उत्साहात आणि दिमाखात सम्पन्न झाला. प्री-प्रायमरीपासून दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत उत्साहाला उधाण आणले. विद्यार्थी व पालकांच्या उत्कृष्ट प्रतिसादामुळे कार्यक्रम रंगतदार बनला. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या सोहळ्यात क्रीडा आणि सांस्कृतिक उर्जेचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला. उद्घाटन शाळेचे…

Read Full News

शिवसेना उमेदवारांचा प्रभाग दहात उत्स्फूर्त प्रचार…

⚡मालवण ता.३०-: मालवण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवारांचा मालवण शहरातील सर्वच प्रभागात जोरदार प्रचार सुरू असून प्रभाग दहा येथे शिवसेनेचे उमेदवार सीताराम लुडबे, भाग्यश्री मयेकर यांच्या प्रचारार्थ प्रभागात शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्स्फूर्त प्रचार फेरी काढण्यात आली. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात विकासाचे व्हिजन घेऊन शिवसेना उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. जनतेचा…

Read Full News

मालवण किल्ला होडीसेवा बंद करण्याचा घाट आमदार निलेश राणे यांचाच…

माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप: निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने हा घाट हाणून पडावा.. ⚡मालवण ता.३०-: मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर पारंपरिक पद्धतीने होडीच्या सहाय्याने जाण्याच्या असलेल्या व्यवस्थेमध्ये अनेक कुटुंबे गुंतलेली आहेत. या पाश्वभूमीवर मालवण शहरातील सुमारे तीनशे ते चारशे कुटुंबियांच्या रोजगाराचे साधन असणारी किल्ला होडीसेवा बंद करण्याचा घाट शिंदे शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी घातलेलाआहे हा घाट…

Read Full News

एकनाथ शिंदे यांची सभा ही केसरकर यांची रिटायरमेंटची सभा…

रुपेश राऊळ:पालकमंत्री होऊन नितेश राणे यांनीही नेमका कोणता विकास केला हे जनतेला सांगावे.. ⚡ सावंतवाडी ता.३०-:सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला आहे. “विकासाच्या नावाने बोलणाऱ्या लोकांना आज मतदारांना पैसे वाटण्याची वेळ आली आहे. पुढील पाच वर्षे हेच लोक विकास करतील का,…

Read Full News

अन्नपूर्णा कोरगावकर यांची प्रचारात जोरदार आघाडी…

⚡ सावंतवाडी ता.३०-: अपक्ष नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून घराघरांत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत, आपली भूमिका मांडत आहेत. “मला एक संधी द्या, शहर सेवेसाठी मी कटिबद्ध आहे,” अशी विनंती त्या नागरिकांना करत आहेत. शहरात सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांकडे दुर्लक्ष करत “मी एका सर्वसामान्य कुटुंबातील आहे, जनतेच्या आशा-आकांक्षा…

Read Full News

सौ .सुजाता संदिप गवस यांचा संविता आश्रमास मदतीचा हात…

⚡सावंतवाडी ता.३०-: पडवे–माजगाव शाळेच्या निवृत्त पदवीधर शिक्षिका सौ. सुजाता संदीप गवस यांनी अनेक वर्षे विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार आणि मानवी मूल्यांचं भांडार देत आपल्या सेवेला एक वेगळीच उंची दिली. याच सेवेचे पुढचे पाऊल म्हणून त्यांनी पणदूर येथील ‘संविता आश्रम, ला एक दिवसाचं अन्नदान व वस्त्रदानाचं सत्कर्म करून आपल्या सेवाभावाची परंपरा जपली.जीवनभर शिक्षणाच्या माध्यमातून उजेड पेरणाऱ्या या…

Read Full News

दोडामार्ग-माणगाव पालखी पदयात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡बांदा ता.३०-: दोडामार्ग ते माणगांव श्री टेंबे स्वामींच्या पालखी पदयात्रेला शुक्रवार दिनांक 28 पासून आरंभ झाला असून मार्गात जागोजागी त्यांचे स्वागत केले जात आहे. यंदाचे या पालखी सोहळ्याचे आठवे वर्ष असून प्रतिवर्षी या पदयात्रेतील भाविकांचा सहभाग वाढत आहे.शनिवारी पहाटे गणपती मंदिर येथून पायी पालखी प्रस्थान झाले. मार्गातसासोली ,कळणे ,आडाळी, डेगवे येथील भाविकांनी पालखीचे स्वागत, पुजन,…

Read Full News

दिग्गजांच्या उपस्थितीत रंगली नाट्यरंग मैफिल…

सद्गुरु संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे साभिनय‑सवेश नाट्यपदांचे सादरीकरण… ⚡सावंतवाडी ता.३०-: श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ आणि सद्गुरु संगीत विद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी राजवाडा सभागृहात 28 तारखेला “नाट्यरंग” साभिनय‑सवेश नाट्यपदांचे सादरीकरण ही मैफिल दिमाखात संपन्न झाली.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्यातील ज्येष्ठ नाट्य‑दिग्दर्शक, नाट्यरत्न श्री वसंत उर्फ भाऊ साळगावकर, सुप्रसिद्ध नाट्य‑दिग्दर्शक श्री गणेश ठाकूर, सुप्रसिद्ध गायक…

Read Full News

You cannot copy content of this page