प्रसिद्ध कीर्तनकार लक्ष्मीप्रसाद कुलकर्णी( पटवारी बुवा)पुणे, यांची कीर्तन पर्वणी..
⚡सावंतवाडी ता.१९-: मळेवाड जकात नाका येथील श्री गणेश मित्रमंडळ आयोजित गुरुवार दि.२२ जानेवारी रोजी श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी
सकाळी ७:०० गणेशयाग प्रारंभ, धार्मिक कार्यक्रम,दुपारी १२:०० वाजता आरती,तीर्थप्रसाद, महाप्रसाद, केळी नारळ ठेवणे गाऱ्हाणे ,सायंकाळी ६:०० वाजता,भजन तसेच मागी गणेशोत्सव निमित्त पुणे येथील प्रसिद्ध कीर्तनकार लक्ष्मीप्रसाद शंकरराव कुलकर्णी( पटवारी बुवा) यांचा ऐतिहासिक विषयावर “कीर्तन पर्वणी” कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री गणेश मित्रमंडळ मळेवाड व ग्रामस्थांनी केले आहे.
