Headlines

नेतर्डे खोलबागवाडीत तरुणीची आत्महत्या…

⚡बांदा ता.०६-: नेतर्डे-खोलबागवाडी येथे आज सकाळी उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेत मयुरी आनंद परब (वय १८) या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सदर घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी घरच्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनेची माहिती तात्काळ स्थानिकांना व पोलिसांना दिली.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस कर्मचारी…

Read Full News

शिक्षण क्षेत्रातील प्रगतीत सुरेश भाईंचे योगदान उल्लेखनीय…

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले: वाढदिवसानिमित्त भेट देत दिल्या शुभेच्छा.. ⚡दोडामार्ग ता.०६-:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ नेते तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त दळवी बिल्डिंग सभागृह येथे विविध पक्षांचे कार्यकर्ते, व्यापारी, डॉक्टर्स, वकील, पत्रकार आदी मान्यवरांनी…

Read Full News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या विचारांवर चालत राहणार…

मंत्री नितेश राणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण.. कणकवली : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा मिळालेली आहे. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर राहिलेला आहे. त्यांनी आपल्या सर्वांना मानव म्हणून जगण्याचा हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळालेला आहे. आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्थानी नतमस्तक झालो. आपला देश आणि…

Read Full News

मालवण समुद्रकिनारी अमूर ससाण्याला जीवदान…

युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेने केले रेस्क्यू.. ⚡मालवण ता.०६-:मालवण समुद्र किनाऱ्यावर मासळी लिलावाच्या ठिकाणी कावळ्यांच्या गराड्यात सापडलेल्या दुर्मिळ अशा अमूर ससाणा या पक्ष्याची युथ बिट्स फॉर क्लायमेट यां संस्थेच्या सदस्यांनी कावळ्यांपासून सुटका करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. मालवण किनाऱ्यावरील मासळी लिलावाच्या ठिकाणी उमेश खांबोळकर यांना ‘अमूर ससाणा’ एका ठिकाणी बसलेला आणि कावळे त्याला…

Read Full News

मराठी साहित्य संमेलनात रुजारिओ पिंटो यांच्या कवितेचा सन्मान…

⚡मालवण ता.०६-: मराठी साहित्य संमेलनात कविकट्टा या काव्यमंचासाठी मालवणचे प्रसिद्ध कवी रुजारिओ पिंटो यांना ‘कोकणं रडत’ ही कविता सादर करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. कविकट्टा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी होणार आहे. पिंटो यांच्या कवितेला मिळालेल्या संधीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ९९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे…

Read Full News

श्री गवळदेव देवस्थान ट्रस्ट च्या वतीने श्रीकृष्ण दिनदर्शिकचे प्रकाशन संपन्न…

⚡सावंतवाडी ता.०६-: श्री गवळदेव देवस्थान ट्रस्ट धार्मिक, सामाजिक उपक्रम राबवित असतानाच चालू वर्षी श्रीकृष्ण दिनदर्शिका 2026 हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला. या दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवार दि 5 डिसेंबर रोजी गावचे प्रमुख मानकरी श्री बाबा गावकर व कु शुभम गावकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमासाठी जाहिरातदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमासाठी तंटामुक्ती अध्यक्ष श्री शंकर…

Read Full News

अश्वमेध स्पर्धेसाठी लीना धुरीची मुंबई विद्यापीठ संघात निवड…

⚡मालवण ता.०६-: नांदेड येथे होणाऱ्या अश्वमेध मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी सिंधुदुर्गची प्रतिभावान खेळाडू लीना धुरी हिची मुंबई विद्यापीठाच्या मुख्य संघात निवड झाली आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्या वर्षी लीना हिने ही कामगिरी बजावत आपल्या क्रीडा कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती घडविली आहे. मुंबई विद्यापीठाच्या संघात १२ मुलींची निवड करण्यात आली असून त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातून निवड झालेली लीना…

Read Full News

सावंतवाडीतील सफाई कामगारांची कायमस्वरूपी नेमणुक करा…

प्रवीण भोसले यांची मंत्री नितेश राणे यांच्याकडे मागणी:आचारसंहिता संपताच प्रक्रिया सुरू होणार, मंत्री राणेंच आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.०६-: महाराष्ट्र सरकारचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री नितेश राणे यांना सावंतवाडी येथे चतुर्थ श्रेणी सफाई कामगारांच्या कायमस्वरूपी नेमणुकीसंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या पुढाकाराने सावंतवाडी नगरपरिषद येथील सफाई कामगारांचे प्रतिनिधी…

Read Full News

मिठबाव श्री देव रामेश्वर पाच दिवसीय डाळपस्वारी 2025 ची रुपरेषा जाहीर…

१३ ते १७ डिसेंबर : धार्मिक विधी, देवतरंग आणि पारंपरिक स्थळी भेटीगाठी ⚡देवगड ता.०६-: शतकानुशतके जोपासली गेलेली आध्यात्मिक परंपरा उजळून मिठबाव श्री देव रामेश्वर पाच दिवसीय डाळपस्वारी 2025 चे औपचारिक वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. १३ ते १७ डिसेंबरदरम्यान भक्तीमय वारी, वयक्तिक न्याय (मेळे), देवतरंग आणि सेवक भेटींच्या धार्मिक वातावरणात पंचक्रोशीतून हजारो भाविक सहभागी होणार…

Read Full News

फोंडाघाटातील दरोडा प्रयत्नातील तीन आरोपी मुंबईतून जेरबंद…

एलसीबीची धडाकेबाज कारवाई:गुन्ह्यातील एर्टिगा कार जप्त.. ⚡कणकवली ता.०६-: फोंडाघाट (गांगोवाडी) येथील लिंग्रस यांच्या घरात घुसून रॉबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिन्ही आरोपींना सिंधुदुर्ग एलसीबीच्या पथकाने अवघ्या पाच दिवसांत मुंबई उपनगरातून जेरबंद केले. ५ डिसेंबर रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली असून आरोपींना कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्यात वापरलेली पिवळ्या नंबर प्लेटची एर्टिगा कारही जप्त…

Read Full News

You cannot copy content of this page