Headlines

निवडणूक निर्णय अधिकारी नितीन राऊत यांच्याकडून पथकांचा आढावा…

⚡देवगड ता.१४-: जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ जाहीर होताच देवगड तालुका जि.प.पं. सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग नितीन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणुकीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विविध प्रकारची २९ पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकात नायब तहसीलदार दर्जाचे अधिकारी पथकप्रमुख म्हणून कामकाज पाहणार असून प्रत्येक…

Read Full News

सिंधुदुर्गातील शासकीय भरतीत स्थानिक तरुणांवर अन्याय…?

परजिल्ह्यातील उमेदवारांची भरती वाढल्याचा आरोप.. ⚡मालवण,ता.१४-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतील भरती प्रक्रियेत स्थानिक सुशिक्षित तरुणांना डावलून परजिल्ह्यातील उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर वर्णी लागत असल्याचा गंभीर आरोप करत जिल्ह्यातील नागरिकांनी आणि सुशिक्षित बेरोजगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. “सिंधुदुर्ग जिल्हा हा परजिल्ह्यातील उमेदवारांसाठी केवळ नोकरी मिळवण्याचे साधन म्हणजेच सोन्याची अंडी देणारी कोंबडी बनला आहे का?” असा संतप्त प्रश्न…

Read Full News

९.२१ कोटींच्या योजनेतून देवगड–जामसंडेला पाण्याचा दिलासा…

दोन महिन्यांत नियमित पुरवठा:पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांची माहिती.. ⚡देवगड ता.१४-: दीर्घकाळापासून अनियमित पाणीपुरवठ्याला सामोरे जाणाऱ्या देवगड–जामसंडे शहराला येत्या दोन महिन्यांत नियमित, स्वच्छ व एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची ठोस ग्वाही पाणीपुरवठा सभापती सौ. तन्वी चांदोस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी राज्य शासनाकडून ९ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, शहरातील…

Read Full News

तेंडोली-गावठाणवाडी शाळेच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर…

आमदार निलेश राणे आणि दत्ता सामंत यांचा पाठपुरावा.. ⚡कुडाळ ता.१४-: तालुक्यातील तेंडोली – गावठणवाडी जि. प. प्राथ. शाळेच्या छप्पराचा भाग कोसळल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत शिंदे शिवसेनेचे तेंडोली उपविभाग प्रमुख रामचंद्र राऊळ यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून आमदार नीलेश राणे यांचे लक्ष वेधले. आमदार श्री. राणे यांनी तातडीने गंभीर दखल घेत तत्परता दाखविली. आमदार…

Read Full News

कचरा टाकल्यास कारवाई करण्याचा वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचा इशारा…

⚡मालवण ता.१४-:वायरी भूतनाथ गावच्या किनारपट्टीवर कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर जय भूतनाथ पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास उपोषणाचा इशारा दिल्यावर याबाबत वायरी ग्रामपंचायतीने दखल घेत किनाऱ्यावर फलक लावून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. वायरी भूतनाथ येथील किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, बाटल्या, टाकावू अन्नपदार्थ टाकण्यात येत होते. यामुळे…

Read Full News

मालवण तालुका काँग्रेस कमिटीची उद्या महत्त्वपूर्ण बैठक…

⚡मालवण ता.१४-:जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार व निवडणूक नियोजनासाठी मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची महत्त्वाची बैठक गुरुवार दि. १५ जानेवारी रोजी येथे सकाळी ११ वाजता हॉटेल मालवणी हेरिटेज, बाजारपेठ- मालवण येथे आयोजित केली आहे. या बैठकीत मालवण तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रांतिक सदस्य, सर्व सेल तालुकाध्यक्ष, सेवादल, महिला काँग्रेस, युवक…

Read Full News

मालवण पालिकेतील स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिल्याबद्दल महेश कांदळगावकर यांचे आमदार निलेश राणे व दत्ता सामंत यांना आभार…

⚡मालवण ता.१४-:मालवण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानतानाच आमदार निलेश राणे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जे आश्वासक ‘व्हिजन’ समोर ठेवले आहे, त्यामध्ये सक्रिय सहभागी होता येणार असल्याचा आनंदही त्यांनी यावेळी व्यक्त केला. श्री. कांदळगावकर म्हणाले की, २०१६ ते…

Read Full News

सिंधुदुर्गच्या ‘आत्मव्रतम्’ चा आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिवल मध्ये डंका…

तृतीय क्रमांकासह लघुपटास इतर दोन मानाची पारितोषिके:ऍड. समीर प्रभू सर्वोत्कृष्ट पटकथाकार, हर्षद जोशी उत्कृष्ट ध्वनी संयोजक.. ⚡कुडाळ ता.१४-: मध्यप्रदेश मधील उज्जैन येथे सोमवारी झालेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय संस्कृत शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ‘आत्मव्रतम्’ या संस्कृत शॉर्ट फिल्मने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. स्वदेशी या आशय गर्भ विषयावर आधारित या लघुपटाला तृतीय क्रमांकाचे मानाचे पारितोषिक प्राप्त…

Read Full News

आमदार राणे यांच्या पाठपुराव्यामुळे त्या’ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 45 लाख निधी…

⚡मालवण ता.१४-:भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम गतवर्षी मालवण, वायरी, तारकर्ली, देवबाग मार्गांवर करण्यात आले. या दरम्यान रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली होती. त्यानुसार वीज विभागाच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी 45 लाख रुपये निधी डिपॉजिट करण्यात आला असून लवकरच रस्त्यांची दुरुस्ती पुर्ण…

Read Full News

बांदा शहराच्या प्रभारी सरपंचपदी राजाराम उर्फ आबा धारगळकर…

⚡बांदा ता.१४-: बांदा शहर ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांनी कार्यभार स्वीकारला आहे. विद्यमान सरपंच प्रियांका नाईक या वैयक्तिक कारणास्तव सुट्टीवर गेल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारी सरपंच म्हणून धारगळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रभारी सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारताच धारगळकर यांचे भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. शहरातील विकासकामे, नागरी समस्या तसेच ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे…

Read Full News

You cannot copy content of this page