मळेवाड-शिरोडा परिसरातून १०८ रुग्णवाहिकेला थेट बांबोळीगोवा येथे जाण्यास परवानगी द्या…

सागर नाणोसकर यांचे जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन; सीमाभागातील रुग्णांसाठी कार्डियाक रुग्णवाहिकेचीही केली मागणी. ..

⚡सावंतवाडी ता.१०-: युवासेनेचे उपाध्यक्ष तथा नाणोस ग्रामपंचायत सदस्य यांनी शिरोडा उपजिल्हा रुग्णालय आणि मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातून १०८ व १०२ रुग्णवाहिका GMC बांबोळी (गोवा) येथे नेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देऊन रुग्णवाहिकेबाबत परवानगी देण्याची मागणी केली.

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र हे गोवा राज्याच्या सीमेजवळ असल्याने येथे दशक्रोशीतील येणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांना, अपघातातील जखमींना किंवा तातडीच्या प्रसूतीसाठी तात्काळ गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी गोवा येथे हलवावे लागते .परंतु सध्याच्या नियमानुसार १०८ रुग्णवाहिका ही थेट बांबोळी गोवा ला जाण्यास अनेकदा तांत्रिक अडचणी येतात किंवा परवानगी मिळत नाही. त्यामुळे रुग्णाला मध्येच दुसऱ्या वाहनातून हलवावे लागते. ज्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा वेळ वाया जातो कित्येक वेळा यामुळे रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण होते.
या गंभीर समस्येबाबत सागर नाणोसकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन देत त्यांचे लक्ष वेधले आहे.

मळेवाड, शिरोडा दशक्रोशी ते बांबोळी गोवा हे अंतर कमी असून थेट परवानगी नसल्यामुळे रुग्णवाहिका नेण्यास अडचणी येत असून यामुळे होणारा विलंब टाळण्यात यावा तसेच खाजगी रुग्णवाहिकेचा खर्च सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना परवडणार नसतो यामुळे १०८ रुग्णवाहिकेची सेवा अखंड मिळणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका गंभीर अपघात किंवा प्रसूतीमधील गुंतागुंत अशा वेळी बांबोळी गोवा हाच जवळचा आणि उत्तम पर्याय असल्याने या रुग्णवाहिकेला गोवा राज्यात थेट प्रवेश मिळावा अशी मागणी सागर नाणोसकर यांनी केली या सोबतच मळेवाड, शिरोडा दशक्रोशिसाठी कार्डियाक रुग्णवाहिका मिळावी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे त्यासाठी पण संबंधित अधिकारी डॉ.श्रीपाद पाटील आणि डॉ.विनायक पाटील, यांनी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्या संदर्भात पण पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

You cannot copy content of this page