⚡रत्नागिरी ता.१०-: परीट (धोबी, मडवळ) समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी महाराष्ट्र परीट (धोबी, मडवळ) समाज संघ या नव्या संघटनेची स्थापना रविवारी ८ मार्च रोजी चिपळूण येथे करण्यात आली आहे. समाजातील एकोपा वाढवणे, युवकांना संघटित करणे आणि समाज विकासासाठी विविध उपक्रम राबविणे हा संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
संघटनेच्या अध्यक्षपदी शांताराम भाऊ कदम यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्ष म्हणून दिलीप चंद्रकांत भालेकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी दिलीप मधुकर कदम, नागेश धोंडी कुडाळकर आणि प्रकाश राजाराम पवार यांची निवड करण्यात आली आहे.
खजिनदार म्हणून नंदकिशोर कोंडीराम राक्षे, सचिवपदी सुभाष अनंत कदम तर सहसचिव म्हणून रविंद्र गणेश कान्हेकर यांची निवड करण्यात आली आहे. संघटकपदी संजय भालचंद्र गायकवाड, महेश महेंद्र भोसले आणि गुरुनाथ गजानन मडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून मनोज महादेव शिंदे, सविता सदाशिव कुडाळकर, अंजली अनंत पिंपळकर, किशोर जनार्दन वासकर, दिलीप जगन्नाथ सुर्वे आणि प्रदीप रमेश नारकर यांचा समावेश करण्यात आला आहे. संघटनेला मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागारपदी दत्ताराम गोविंद महाडिक, मोहन वालकर आणि हसमुख पांगारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नव्या संघटनेच्या माध्यमातून परीट (धोबी, मडवळ ) समाजातील शैक्षणिक प्रगती, सामाजिक एकोपा आणि विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. तसेच समाजातील तरुणांना प्रोत्साहन देऊन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, संघटनेच्या स्थापनेनंतर लवकरच रोहा, जि. रायगड येथे अध्यक्ष शांताराम भाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली परीट (धोबी, मडवळ) समाजाचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असून या मेळाव्यात समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
