कणकवलीत जागतिक महिला दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन…

१२ मार्च रोजी नगरपंचायत बहुउद्देशीय हॉलमध्ये शिबिर ; नागरिकांना रक्तदानाचे आवाहन..

⚡कणकवली ता.१०-: जागतिक महिला दिनानिमित्त कणकवली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १२ मार्च २०२६ रोजी कणकवली नगरपंचायतच्या बहुउद्देशीय हॉलमध्ये हे शिबिर पार पडणार आहे.

या शिबिराचे आयोजन कणकवली नगरपंचायत, महिला व बालकल्याण विभाग, कनकसिंधू शहर स्तर संघ कणकवली आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

सामाजिक बांधिलकी जपत अधिकाधिक रक्तसाठा उपलब्ध व्हावा आणि गरजू रुग्णांना वेळेत रक्त मिळावे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page