Headlines

राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन करणे हे कृत्य हास्यास्पद…

साक्षी वंजारी: युतीशिवाय शिंदे सेनेच मतदारसंघात स्वतंत्र अस्तित्व काय..? ⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन करणे हे कृत्य हास्यास्पद असून, एका प्रादेशिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील विषयांवर बोलताना आपली उंची, अभ्यास आणि जबाबदारी लक्षात घ्यावी, अशी टीका काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारे यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, भारत-अमेरिका व्यापार…

Read Full News

सावंतवाडी शाळा क्रमांक 6 चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२१-:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी क्रमांक ६ व कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभ तसेच ISO (9001:2015) मानांकन प्रदान सोहळा मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये…

Read Full News

होडावडा श्री देव चावडीचा चाळा देवाचा जत्रोत्सव उद्या..

⚡वेंगुर्ला ता.२१-: तालुक्यातीलहोडावडा श्री देव चावडीचा चाळा (न्हईकरवाडी )देवाचा जत्रोत्सव रविवार 22 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. यनिमित्त सकाळी 10 ते 12 वा. या वेळेत भाविकांची वार्षिक राखण देणे व नवस फेडणे, दुपारी 2 ते 4 वा. या वेळेत भोजन प्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दळवी…

Read Full News

तळेखोल गावात CSR निधीतून विकासकामांना वेग; पाणीटंचाई दूर होण्याची आशा…

⚡दोडामार्ग ता.२१-:तळेखोल गावात CSR (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीच्या माध्यमातून विविध विकासकामांना वेग आला असून गावातील मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होत आहे. DSV आणि Voluntary Health Association of Goa यांच्या संयुक्त विद्यमाने ही कामे हाती घेण्यात आली आहेत.या उपक्रमांतर्गत तळेखोल येथील वाटुळवाडी परिसरात विहीर बांधकामासह पाण्याच्या टाकीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या अनेक…

Read Full News

वयाच्या २२ व्या वर्षी साहिल शेटवेची मोठी झेप; नवी मुंबई मेट्रो प्रकल्पात निवड…

⚡दोडामार्ग ता.२१-:तिलारी शेटवेवाडी येथील युवक साहिल शरद शेटवे याने अवघ्या २२ व्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन करत नवी मुंबई मेट्रो लाईन–१ (NMML-1) मध्ये निवड मिळवली आहे. सीबीडी बेलापूर ते पेणधर या महत्त्वाच्या मार्गावर कार्यरत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात त्याची निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.साहिल हा कट्टर राणे समर्थक म्हणून ओळख असलेले कै….

Read Full News

बांदा येथे श्री स्वराज्य प्रतिष्ठानचा भव्य शिवजन्मोत्सव उत्साहात…

⚡बांदा ता.२१-: छत्रपती शिवराय हे महान योद्धा असण्याबरोबरच स्वराज्याचे संस्थापक, तसेच सुजाण प्रशासक व द्रष्टे राष्ट्रनिर्माता होते. महाराष्ट्राच्याच नव्हे तर समस्त भारतवर्षाच्या इतिहासात शिवरायांचे जीवन देदिप्यमान व अनन्यसाधारण ठरणारे आहे. एका आदर्श प्रशासकाला आवश्यक असणारे शिस्त, जोखीम स्वीकारण्याचे धाडस, न्याय, दूरदृष्टी, विवेक, अखंड परिश्रम हे सर्व गुण त्यांच्या ठायी होते. छत्रपती शिवरायांचा हा वारसा शिवविचार…

Read Full News

दिवाणी न्यायालय कणकवली येथे मध्यस्थी जागृती कार्यक्रमांतर्गत कायदेविषयक शिबिराचे यशस्वी आयोजन ..

कणकवली : दिवाणी न्यायालय कणकवली येथे मध्यस्थी जागृती कार्यक्रम २०२५ -२६ अंतर्गत दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी “Meditation Action Plan” च्या अनुषंगाने प्रेरणादायी व समाजोपयोगी कायदेविषयक शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराचे अध्यक्षस्थान दिवाणी न्यायाधीश शुभम गोविंद लटूरिया यांनी भूषविले. न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांना पर्यायी, जलद व सौहार्दपूर्ण तोडगा देणारी मध्यस्थी ही संकल्पना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी,…

Read Full News

वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कारावर जिल्ह्याची मोहोर…

डॉ श्रीपाद पाटील, डॉ सई धुरी यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांचा उद्या होणार सन्मान.. ⚡ओरोस ता २१-: महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयोजित वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान सोहळा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह,मुंबई येथे संपन्न होणार आहे. या मानाच्या पुरस्कारांचे वितरण सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व इतर मान्यवरांच्या हस्ते…

Read Full News

वालावल येथे शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न…

⚡कुडाळ ता.२१-: शिवजयंतीचे औचित्य साधून युवा संघर्ष मित्रमंडळ, वालावल यांच्या वतीने गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर येथे भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या वक्तृत्व कौशल्याने उपस्थितांची मने जिंकली.​कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवनियुक्त जि प सदस्य…

Read Full News

सावंतवाडीत शिवसेनेचे आंदोलन, राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील वक्तव्याचा निषेध.. ⚡सावंतवाडी ता.२१-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून सावंतवाडीत शिवसैनिकांनी कॉग्रेस नेते राहुल गांधींचा पुतळा जाळला. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत पंतप्रधानांवर केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. अमेरीका आणि भारत करारावर व पंतप्रधान मोदींबाबत वापरलेल्या अपशब्दांचा निषेध म्हणून आम्ही पुतळ्याचे दहन करत असल्याचे…

Read Full News

You cannot copy content of this page