Headlines

तळवणे येथील श्री देवी माऊली मंदिरात १८ ते २३ पर्यंत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन …

गावात उत्साहाचे वातावरण:कलशारोहण कार्यक्रम २२ रोजी..

⚡सावंतवाडी ता.१७-: तळवणे येथील देवी माऊली मंदिरात शनिवार दिनांक १८ ते २३ एप्रिल पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तळवणे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची रुपरेषा ,शनिवार दि. १८ एप्रिल सकाळी ८.०० वा. यजमानदेहशुध्दी अंगभूत पंचगणाहोम, कूष्मांड होम, गणपती पूजन, पुण्याहवाचनादी, आचार्यवरण, शांतिसूक्त जप, स्थलप्राकारशुध्दी, पार्थिव गणपती पूजन, प्रतिष्ठांगभूत देवता आवाहन पूजन, देवताजलाधिवास, दुपारी २.०० वा. नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद,सायं. ७.३० वा. श्री गुरुकृपा मित्रमंडळ, तळवणे-मठवाडी पुरस्कृत “भजन संध्या”,गोवा राज्यातील सुप्रसिद्ध गायक शुभग नाईक व साथी कलाकार यांचा सुमधुर “भजनाचा कार्यक्रम”
रविवार दि. १९ एप्रिल सकाळी ८.०० वा. स्थलप्राकारशुध्दी, आवाहित देवतापूजन, शांतीहोम, देवतास्नानविधी, अंगभूत गंगापूजन, द्वादशकलशाभिषेक, देवताशय्याधिवास नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद ,सायं. ७.०० ते ९.०० वा. सुमधुर “संगीत मैफिल”
गायक तारकेश जोशी (मुबंई) हार्मोनियम कु. मंदार जोशी (कोनशी) तबला भावेश राणे (रेडी) / ओंकार मेस्त्री (सांगेली),रात्री १०.०० वा. वैभवी क्रिएशन डिचोली निर्मित आनी अमर फाळकर प्रस्तुत दोन अंकी धमाल मराठी विनोदी नाटक,”जावई Silent सासूबाई Violent”
सोमवार, दि. २० एप्रिल,सकाळी ८.०० वा. स्थलप्राकारशुध्दी, आवाहित देवतापूजन, अग्निस्थापन, वास्तू ग्रहयजन वास्तूस्थापन, प्रतिष्ठागभूत, प्रधानहोमरंभ, नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद, सायं. ७.०० ते ९.०० वा. श्री रवळनाथ सांस्कृतिक कला मंडळ, नाईकवाडा, पालये, पेडणे – गोवा,ढोलकी भजन मंडळ , रात्रौ १०.०० वा. “षडयंत्र” नाटक
मंगळवार, दि. २१ एप्रिल ,सकाळी ८.०० वा. स्थलप्राकारशुध्दी, आवाहित देवतापूजन, चंडीअनुष्ठान, अंगभूत देवता, आवाहन पूजन, चंडीपाठवाचन, प्रतिष्ठांगभूतहवन, नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद ,सायं. ६.०० ते ९.०० वा. “सूर संगम”(अभंग, भक्तीगीत व नाट्यसंगीत यांचा संगीत कार्यक्रम) गायक पुरुषोत्तम परब (वडखोल),दत्तगुरु केळकर (पालये गोवा)दुर्गेश मिठबांवकर (कणकवली), तबला: कु. ओंकार तळवणेकर पखवाज भावेश राणे, मंजिरी अजित पोळजी,रात्रौ १०.०० वा. लिंगेश्वर कला क्रिडा मंडळ पालववाडी, तळवणे यांच्यावतीने,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत संगीत ऐतिहासिक तीन अंकी नाट्यप्रयोग “गगनात घुमली शिवगाथा”बुधवार, दि. २२ एप्रिल सकाळी ८.०० वा. स्थलप्राकारशुध्दी, आवाहित देवतापूजन, चंडीअनुष्ठान, अंगभूत देवता, प्रतिष्ठांगभूतहवन, तत्वहोम, १२ वा. ७ मि. च्या शुभमुहुर्तावर “कलशारोहण” नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद,रात्री १०.०० वा.
नवयुवक नाट्यसंपदा तळवणे यांची दोन अंकी महान ऐतिहासिक नाट्यकलाकृती “करीन ती पूर्व”
गुरुवार, दि. २३ एप्रिल सकाळी ८.०० वा. स्थलप्राकारशुध्दी, आवाहित देवतापूजन, उत्तरांगहोम सकाळी १० वा. २५ मि. या शुभमुहुर्तावर श्री देवी माऊली परिवार देवतांची स्थापना प्राणप्रतिष्ठापूर्वक महापूजा, पुजांगहोम, क्षेत्रपाल बलिदान, पूर्णाहुती, अभिषेक, नैवेद्य, आरती, देवताप्रार्थना, आशिर्वादग्रहण, तीर्थप्रसाद व महाप्रसाद ,रात्री ९.०० वा. लॉटरी सोडत निकाल व बक्षिस वितरण तसेच रात्री १०.०० वा.नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग,शुक्रवार, दि. २४ एप्रिल रोजी सायं. ७.०० वा. श्री गणेशमुर्तीचे विसर्जन.

You cannot copy content of this page