Headlines

तेरेखोल नदीत मगरीचा हल्ला; वाफोलीतील बैल गंभीर जखमी…

बांदा/प्रतिनिधीतेरेखोल नदीत वाफोली–इन्सुली सीमेवरील रूमडाची कोंड येथे मगरीच्या हल्ल्यात बैल जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, वाफोली येथील समीर शिरोडकर यांच्या मालकीचा बैल नदीकाठी चरण्यासाठी नेण्यात आला होता. त्यावेळी पाण्यात दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक हल्ला चढवत बैलाच्या पायाचा लचका तोडला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली.बैल गंभीर जखमी झाला…

Read Full News

कोकण परिक्षेत्रात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर…

⚡सिंधुदुर्ग दि.२३-: कोकण परिक्षेत्रातील विविध जिल्ह्यांतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश २२ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात आले आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार तसेच परिक्षेत्रीय आस्थापना मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या विनंत्यांचा विचार करून बदली करण्यात आली आहे. बदली…

Read Full News

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी पत्रकार अमित खोत यांची निवड…

⚡मालवण ता.२३-:हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने १९ मार्च गुढीपाडवा निमित्त दरवर्षी प्रमाणे भव्यदिव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण शहरातून निघणार आहे. स्वागत यात्रेचे हे 23 वे वर्ष असून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी पत्रकार अमित खोत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती संस्थापक भाऊ…

Read Full News

संत साहित्य जीवनमार्ग हे दर्शविणारे…

अ‍ॅड. देवदत्त परुळेकर; ‘कै. प्र. श्री. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार’ प्रदान.. ⚡बांदा ता.२३-: “संत साहित्य हे केवळ अध्यात्म नाही, तर ते जीवन जगण्याचा मार्ग आहे. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ माणसाला अंतर्मुख करतो आणि समाजाशी जोडून ठेवतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अ‍ॅड. देवदत्त परुळेकर यांनी येथे केले. श्री परुळेकर यांना यंदाचा नट वाचनालयचा मानाचा ‘कै. प्र. श्री. नेरुरकर…

Read Full News

मालवणात मोटरसायकलवरून अनधिकृतपणे गादी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई…

⚡मालवण ता.२३-:मालवण शहरात अनधिकृतपणे मोटरसायकल वरून गादी विक्रीसाठी फिरणाऱ्या तीन परप्रांतीय विक्रेत्यांना मालवणातील जागरूक तरुणांनी पकडून पोलीसांच्या हवाली केली. पोलिसांकडून या विक्रेत्यांवर मोटार वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. मालवण शहरात काही परप्रांतीय विक्रेते मोटरसायकलवर मोठ्या प्रमाणात गाद्यांचा लोड घेऊन फिरून विक्री करत असल्याचे शहरातील काही जागरूक तरुणांच्या निदर्शनास येताच देऊळवाडा येथे तरुणांनी तीन विक्रेत्यांना…

Read Full News

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. नीलिमा इनामदार यांचा पदभार स्वीकार…

⚡कणकवली ता.२३-:कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. नीलिमा इनामदार यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे रुग्णालयाच्या वैद्यकीय सेवांना नवे बळ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. इनामदार यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली तसेच डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ आणि रुग्णसेवेबाबत माहिती घेतली. रुग्णांना…

Read Full News

संत गाडगेबाबा जयंती निमित्त दोडामार्गमध्ये ई-वेस्ट संकलन उपक्रमाची सुरुवात…

⚡दोडामार्ग ता.२३-:संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधत पूर्णम इकोव्हिजन संस्था आणि सिंधुदुर्ग जिल्हा पर्यावरण गतिविधी यांच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग येथे इलेक्ट्रॉनिक कचरा (ई-वेस्ट) संकलन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला दोडामार्ग नगरपंचायत यांचे सहकार्य लाभले.उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, पर्यावरण गतिविधीचे संयोजक शरदचंद्र गवस तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता,…

Read Full News

कुडाळ न.प. बैठकीत नगरसेवकांचा प्रशासनाबाबत नाराजीचा सूर…

कुडाळ नगर पंचायतीच्या सर्वसाधारण सभेत ‘कचरा’ प्रश्न गाजला :घनकचरा प्रकल्प, अनधिकृत बांधकाम अहवाल, कचरा गाड्या विषय गाजले.. ⚡कुडाळ ता.२३-: कुडाळ नगर पंचायतच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वच नगरसेवकांचा प्रशासनाबाबत कमालीचा नाराजीचा सूर दिसून आला. कचरा असुदे, चुकीचे बांधकाम असू दे, कचरा गाड्या दुरुस्ती असुदे, अशा विविध गोष्टीबाबत नगरसेवक आणि नागरिकानी सूचना करून देखील प्रशासन त्याची…

Read Full News

साटेली तर्फ सातार्डा येथे दुचाकी स्वाराचा अपघात…

दुचाकी स्वार गंभीर: नागरिकांनी तात्काळ मळेवाड आरोग्य केंद्रात केले दाखल.._ ⚡सावंतवाडी ता.२३-: साटेली तर्फ सातार्डा ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर मळेवाड ते सातार्डा दरम्यान जाणाऱ्या दुचाकी स्वाराचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर झाला असून साटेली येथील ग्रामस्थांनी तत्काळ दखल घेत मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.यावेळी साटेली उपसरपंच बाबा कोरगावकर, शैलेश नाईक,विष्णु मांजरेकर ,…

Read Full News

महापुरुष महाउत्सव म्हणजे कणकवलीचा ‘मिनी पर्यटन महोत्सव’…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे प्रतिपादन:महिलांचा व्वा वुमनिया ह्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांचा उत्साहात शुभारंभ.. ⚡कणकवली ता.२३-: शहरातील प्रसिद्ध श्री देव महापुरुष मंदिरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महापुरुष मित्रमंडळ आयोजित ‘महापुरुष महाउत्सव’ म्हणजे कणकवलीचा मिनी पर्यटन महोत्सव आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. महाउत्सवातील दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. श्री देव गणपती व श्री देव…

Read Full News

You cannot copy content of this page