⚡सावंतवाडी ता.१९-: मळेवाड (जकातनाका) येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्री देव काळोबा मंदिरात मंगळवार दिनांक २१ एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी मंदिरात ब्राह्मण भोजन ,दुपारी श्री सत्यनारायण महापूजा ,आरती, तीर्थप्रसाद
तसेच यानिमित्ताने रात्रौ ठीक ८:३० वाजता श्री .बाळकृष्ण गोरे पारंपारिक लोककला दशावतार नाट्य मंडळ,कवठी (कुडाळ) दिनेश गोरे यांचा नाट्य प्रयोग होणार आहे.
तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मळेवाड मुरकरवाडी ग्रामस्थ व श्री देव काळोबा कला क्रीडा मंडळ यांनी केले आहे
मळेवाड येथील श्री काळोबा मंदिरात २१ रोजी धार्मिक कार्यक्रम…
