Headlines

डिंगणे येथे मोफत प्राथमिक वैद्यकीय सेवेचा शुभारंभ…

⚡बांदा ता.०४-: योग विद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई व सिंधुमित्र सेवा सहकार्य प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्रँड मास्टर चोआ कोक सुई मुंबई (जिल्हास्तरीय) केंद्रिय प्रकल्प अंतर्गत मोफत प्राथमिक वैद्यकीय सेवेचा शुभारंभ आज डिंगणे गावात उत्साहात संपन्न झाला.या उपक्रमांतर्गत गरजू नागरिकांना मोफत प्राथमिक तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गावकऱ्यांनी या…

Read Full News

तिलारी खोऱ्यात हत्ती प्रश्नावर शेतकऱ्यांचा एल्गार…

⚡दोडामार्ग ता.०४-: तालुक्यातील तिलारी खोऱ्यात काजू हंगामात हत्तींच्या मुक्त संचारामुळे होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी निर्णायक लढ्याचा इशारा दिला आहे. केर येथे ग्रामस्थ व वनविभागाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रथम लोकप्रतिनिधींना भेटून प्रश्न मांडण्याचा, ठोस आश्वासन न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी १३ सदस्यीय संघर्ष समिती स्थापन करण्याचे ठरले.शेतकऱ्यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे,…

Read Full News

बलिदान मासानिमित्त शारदा विद्यामंदिर सावळवाडा शाळेत शिवकालीन ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन…

शिवशंभू ग्रुप मळगावचा इतिहास जागवणारा प्रेरणादायी उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.०४:- मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाचे औचित्य साधून आताच्या पिढीस ऐतिहासिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी मळगाव येथील शारदा विद्यामंदिर, सावळवाडा शाळेत प्रथमच शिवकालीन दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन व माहिती हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.शालेय विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी गोडी निर्माण करणे, दुर्गसंवर्धनाचे महत्त्व समजावून…

Read Full News

सिंधुदुर्गात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध…

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.०४-: मध्यपूर्व आशिया तसेच आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जाऊ नये.असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंधन पुरवठ्‌याबाबत खबरदारीचा उपाय…

Read Full News

‘त्या’ अपघात प्रकरणी सा.बां. वर गुन्हे दाखल करा…

रुपेश पावसकर:कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेत केली मागणी:सार्वजनिक बांधकामच्या कार्यालयावरही धडक.. कुडाळ : कुडाळ-नाबरवाडी येथे घडलेल्या अपघातासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता व शाखा अभियंता यांना जबाबदार धरून त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी केलीय आहे. रुपेश पावसकर यांनी आज सकाळी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदतर्फे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीतर्फे जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आला आहे. महिला व बालकल्याण समिती मार्फत दि. ८ मार्च २०२६ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृहात हे कार्यक्रम होणार असून सकाळी ९ वा. पाककला स्पर्धा, गोड पदार्थ व…

Read Full News

सबनीसवाड्यात भटक्या श्वानांवर नियंत्रणासाठी स्वखर्चाने निर्बीजीकरण…

निशांत तोरस्कर व डॉ. चंद्रशेखर गवस यांचा पुढाकार: नागरिकांकडून उपक्रमाचे कौतुक… ⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा परिसरात भटक्या श्वानांच्या वाढत्या त्रासामुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना या समस्येचा मोठा सामना करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर निशांत तोरसकर व त्यांचे सहकारी डॉ. चंद्रशेखर गवस…

Read Full News

हत्तींना हटवा; नाहीतर ‘वन’समोर ठाण मांडू…

कोलझर पंचक्रोशीचा इशारा: काजू उत्पन्नच सडले तर जगायचे कसे..? सावंतवाडी, ता.४ : काजू उत्पन्नावर आमच्या परिसरातील शेकडो कुटुंबांचे वर्षभरचे अर्थकारण चालते. आता काजू गोळा करण्याच्या हंगामातच बागामध्ये हत्तींनी ठाण मांडल्यामुळे उत्पन्न झाडाखाली सडून जात आहे. मग आम्ही पुढचे वर्षभर कुटुंब चालवायचे कसे असा संतप्त सवाल करत आमच्या पंचक्रोशीतून चार दिवसांत हत्तीना हटवा. अन्यथा आम्ही वन…

Read Full News

नाणोस जोशीवाडी येथील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.०४-: नाणोस जोशीवाडी येथील महापुरुष देवस्थान पर्यतच्या रस्त्यास संरक्षण भिंत व मुख्य रस्ता ते महापुरुष देवस्थान पर्यतचा रस्ता काँक्रिटीकरण या कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर , पंचायत समिती सदस्य नेहा कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाणोस सरपंच अमिता नाणोसकर, ग्रामपंचायत सदस्या रसिका जोशी, सानिया शेट्ये, ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर, सखाराम जोशी,…

Read Full News

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे जेट टॉईज स्पर्धेत उत्तुंग यश …

⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी जेट टॉईज स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादित केले. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, मुंबई द्वारे आयोजित लोकल ऑलिंपिक जेट टॉईज स्पर्धा गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी वसुंधरा सायन्स सेंटर कुडाळ येथे संपन्न झाली. या स्पर्धेत कु श्लोक सावंत, कु रिया जेवरे, कु….

Read Full News

You cannot copy content of this page