माजगाव ग्रामपंचायत सरपंचपदी रंजना कानसे यांचा १५८ मतांनी दणदणीत विजय

सावंतवाडी : माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपा महायुतीच्या रंजना रवींद्र कानसे यांनी अपक्ष जयश्री दिनेश सावंत यांचा १५८ मतांनी पराभव करीत विजय मिळविला.

अवघे ४०.११ टक्के मतदान झालेल्या या निवडणुकीत एकूण ४१८५ मतदारांपैकी १६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ७८२ महिला मतदारानी तर ८९७ पुरुष मतदारांचा समावेश होता. या निवडणुकीत रंजना रवींद्र कानसे यांना 882 मते तर जयश्री दिनेश सावंत यांना 724 मते मिळाली. जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. महायुतीचा महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हा विजय असल्याचा विश्वास श्री. सावंत यांनी व्यक्त केला. यावेळी फटाके फोडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

You cannot copy content of this page